देश

नववधूचा पदर दूर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण

आरोग्य कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी केली बेदम मारहाण

शर्वरी जोशी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. शहरापासून गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. तसंच वेळोवेळी नागरिकांची कोविड चाचणीदेखील करण्यात येत आहे. यासाठ वैद्यकीय कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, एका नववधूची कोविड चाचणी करणं उत्तर प्रदेशातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला (UP Health Department) महागात पडली आहे. नववधूचा पदर डोक्यावरुन दूर सारल्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्याला चक्क गावकऱ्यांनी मारहाण केली आहे. (villagers beaten medical team during corona testing)

अलीगढ जिल्ह्यात असलेल्या टप्पल (Tappal) परिसरातील साहा नगर सोरौला या गावात हा प्रकार घडला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाची कोविड चाचणी सुरु होती. त्यामध्येच एका नववधूची चाचणी करण्यावरुन या कोविड सेंटरवर हाणामारी झाल्याचं समोर आलं.

गावात कोविड चाचणी होत असतानाच एक नववधू (Newly married girl) कोरोना चाचणी करण्यास आली. त्यावेळी स्वॅब टेस्ट करण्यासाठी या नववधूला डोक्यावरील पदर दूर करण्यास सांगितला. परंतु, या वेळी या महिलेच्या आजुबाजूला गावातील काही ज्येष्ठ पुरुष मंडळी व युवक असल्यामुळे या महिलेने पदर दूर करण्यास नकार दिला. त्यामुळे लॅब टेक्निशिअन सौरभ अत्री यांनी गावकऱ्यांना काही वेळ बाहेर उभं राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सौरभ अत्री यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सौरभ अत्री यांनी ज्येष्ठांचा अपमान केल्याचं म्हणत या गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. सोबतच दोन अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी सध्या टप्पल पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT