amit shah esakal
देश

अमित शहांनी सांगितला समाजवादी पक्षाच्या ABCDचा नवा अर्थ; म्हणाले, 'A म्हणजे... '

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) येत्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे सुरु आहेत. आज मंगळवारी समाजवादी पार्टीवर निशाणा साधत अमित शहा यांनी ABCD चा अर्थ सांगितला आहे. एबीसीडी म्हणजे 'अपराध-आतंक, भाई-भतीजावाद, करप्शन आणि दंगा' आहे. (UP Assembly election 2022)

शहा यांनी हरदोई आणि सुलतानपूरमधील जनसभेला संबोधित केलं. 'जन विश्वास यात्रा'अंतर्गत आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी म्हटलंय की, समाजवादी पार्टीची एबीसीडी ही उल्टीच आहे. ए चा अर्थ आहे अपराध आणि आतंक, बी चा अर्थ आहे भाई-भतीजावाद, सी चा अर्थ आहे करप्शन आणि डी चा अर्थ आहे दंगा... असा नवा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला आहे.

समाजवादी अत्तर बनवणाऱ्याला २५० कोटी रुपये

शहा यांनी म्हटलंय की, भाजपाने समाजवाद्यांच्या या एबीसीडीवर पाणी फेरण्याचं काम केलंय. त्यांनी म्हटलंय की, आयकर विभागाने छापा मारला तर अखिलेश यांच्या पोटात ढवळून निघालं. ते म्हणाले की, राजकीय द्वेषापोटी हा छापा मारला गेला आहे. त्यांना दुसरं कोणतंच उत्तर सापडलं नाही. कारण समाजवादी अत्तर बनवणाऱ्यांच्या कडून छाप्यामधून २५० कोटी रुपये सापडले आहेत.

त्यांनी पुढे प्रश्न केला की, कुणी अडीचशे कोटी रुपये पाहिले तरी आहेत का? शहा यांनी पुढे म्हटलं की, हे सगळे पैसे जनतेकडून लुटलेले पैसे आहेत. अखिलेशजी, तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका. कारण मोदीजींनी सत्ता यायच्या आधीच म्हटलं होतं की, भाजप या देशातील भ्रष्टाचार नेस्तनाबूत करेल आणि काळा पैसा नष्ट करेल.

सपा-बसपाचा होणार सुपडासाफ

त्यांनी बहुजन समाज पार्टीवर हल्लाबोल करत म्हटलं की, उत्तर प्रदेशमध्ये तीनशे हून अधिक जागा जिंकत भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये भाजप जिंकली तर २०२२ मध्ये सलग चौथ्यांदा भाजप सपा-भाजपचा सुपडासाफ करेल. सपा सत्तेवर आल्यावर फक्त एकाच जातीचा विकास करत होती आणि बसपा दुसऱ्या जातीचा विकस करायची. मोदीजी आल्यानंतर आता कुठे सबका साथ आणि सबका विकास सुरु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

'सोलापुरातील ॲड. राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ'; न्यायाधीशासमोर दोन साक्षीदारांची महत्त्वाची साक्ष..

SCROLL FOR NEXT