ISI agent arrest from Merrut Esakal
देश

ISI Agent Arrest: मॉस्कोतील भारतीय दूतावासात पाकिस्तानी एजंट? यूपी एटीएसकडून अधिकाऱ्याला अटक, ISI ला माहिती दिल्याचा आरोप

ISI agent arrest from Merrut: पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारताविरुद्ध कट रचण्यात कायमच अग्रेसर आहे. अशातच रशियातील भारतीय दूतावासात तैनात असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारताविरुद्ध कट रचण्यात कायमच अग्रेसर आहे. अशातच रशियातील भारतीय दूतावासात तैनात असलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. भारतीय कर्मचारी असूनही पाकिस्तानी एजन्सी इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) साठी काम करत होता. त्याला मेरठमधून अटक करण्यात आली असून, यूपी एटीएसने ही कारवाई केली आहे.

सत्येंद्र सिवाल असे या आयएसआय एजंटचे नाव असून तो मॉस्कोमधील भारतीय दूतावासात भारतीय सुरक्षा सहाय्यक (IBSA) म्हणून तैनात होता. सत्येंद्र भारतीय लष्कर आणि आयएसआयशी संबंधित महत्त्वाची माहिती देत ​​होता. सत्येंद्र 2021 पासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासात तैनात असल्याचे सांगितले जात आहे.

यूपी एटीएसला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर परराष्ट्र मंत्रालयाच्या (भारत सरकार) कर्मचाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून आणि हनी ट्रॅपिंग करत असल्याची माहिती मिळाली होती. यूपी एटीएसने या इनपुटची चौकशी केली असता, सत्येंद्र सिवाल यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला दिलेल्या माहितीच्या बदल्यात पैसेही पाठवण्यात आल्याचे आढळून आले आहे.

भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय एजंट्सच्या माध्यमातून गोळा केली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरचे रहिवासी सत्येंद्र सिवाल हे परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग, स्टाफ) या पदावर नियुक्त आहेत. तो सध्या रशियाची राजधानी मॉस्को येथे असलेल्या भारतीय दूतावासात कार्यरत होता. अटकेनंतर सत्येंद्रकडून दोन मोबाईल फोन, आधार कार्ड आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT