Yogi Adityanath Team eSakal
देश

नामांतराची मालिका सुरूच; फैजाबाद रेल्वे जंक्शनला CM योगींनी दिलं 'हे' नाव

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे.

सुधीर काकडे

आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर उत्तर प्रदेश सरकार मोठे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील अनेक शहरांचं नामांतर करण्यात आलं आहे. नामांतराच्या या यादीत आता फैजाबाद रेल्वे जंक्शनचं देखील नाव आलंय. उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नाव बदलून अयोध्या कॅन्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला असून, लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ला अयोध्येला फैजाबाद असा उल्लेख करणारे पोस्टर्स काढून टाकण्याचे आदेश दिल्याच्या घटनेला काही दिवस उलटताच हा निर्णय घेण्यात आलाय.

AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या प्रदेश दौऱ्यापूर्वी अयोध्येला फैजाबाद असे संबोधणारे पोस्टर्स जिल्हाभर लावण्यात आले होते. बॅनरमध्ये अयोध्येचे जुने नाव 'फैजाबाद' वापरल्याबद्दल लोकांनी या पोस्टर्सवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT