देश

यूपीत मतदान केंद्राजवळ सायकलवर झाला बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, एक जखमी

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी सध्या मतदान सुरु आहे. यादरम्यान आज प्रयागराजमधून एक सनसनाटी बातमी आली आहे. मतदान केंद्रापासून जवळपास 10 मीटरच्या अंतरावर एक बॉम्ब ब्लास्ट झाल्याने गोंधळ माजला आहे. या साऱ्या प्रकारामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती जखमी झाला आहे.

या घटनेनंतर मोठा गोंधळ माजला कारण या केंद्रावर मतदान सुरु होतं. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घाईघाईने घटनास्थळी पोहोचले असता त्यांना या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं. हे संपूर्ण प्रकरण प्रयागराजमधील करेली पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात येतं ज्याठिकाणी हा स्फोट झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांचं असं म्हणणं आहे की, हे दोन्ही युवक सायकलवरुन एका पिशवीतून बॉम्बसदृश्य स्फोटक घेऊन जात होते. मात्र, ते आपल्याच बॉम्बच्या स्फोटाचे शिकार झाले आहेत. या स्फोटामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर त्याचा चुलत भाऊ जबर जखमी झाला आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

असं सांगितलं जात आहे की, सायकलच्या हँडलला ही पिशवी लटकवण्यात आली होती. तसेच या पिशवीमध्ये काही देशी बॉम्ब ठेवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलंय की, अधिक तपासाअंती निष्पन्न होऊ शकेल की, या स्फोटामागचा हेतू काय होता? निवडणुकीशी याचा काही संबंध होता का, याचाही तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT