देश

'गुजरातचे दोन गाढव'; दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले PM मोदी?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्तसंस्थेला आज मुलाखत दिली आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. सामान्यत: पंतप्रधान मोदी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत नाहीत, अशी टीका विरोधक सातत्याने करतात. आजही पंतप्रधान मोदींनी मुलाख दिल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान मोदींनी या पाचही राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपणच विजयी होणार असल्याचं ठासून सांगितलं आहे. (Assembly Election 2022)

यावेळी बोलताना त्यांनी अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, आपण याआधीही दोन मुलांचा खेळ पाहिला आहे. ते इतके उद्धट आहेत की, त्यांनी याआधी 'गुजरात के दो गधे' असा उल्लेख केला होता. त्यानंतर यूपीने त्यांना धडा शिकवला आहे. आणखी एकेवेळी त्यांच्यासोबत 'दोन मुले आणि एक बुवाजी' त्यांच्यासोबत होत्या. मात्र, तरीही काही गणित जमलं नाही, अशी टीका मोदींनी यूपीतील भाजपच्या विरोधकांवर केली आहे.

पुढे ते म्हणाले की, जिथे जिथे भाजपला स्थैर्याने काम करण्याची संधी देण्यात आली आहे, तिथे तुम्हाला सत्ताविरोधी नव्हे तर प्रो-इन्कम्बन्सीचे वातावरण पाहायला मिळेल. भाजप नेहमीच प्रो-इन्कम्बन्सीसह निवडणुकीत उतरतो, असा दावा त्यांनी केला आहे.

भाजप नेहमीच जनतेच्या सेवेत सहभागी असतो. सत्तेत असताना आम्ही 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन काम करतो. मला सर्व राज्यांमध्ये भाजपची लाट दिसत आहे. आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि 5 राज्यांतील लोक आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी देतील, असंही त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT