Chief Chandrashekhar Azad sakal media
देश

UP Election : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद CM योगींविरोधात लढणार

उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची निवडणूक असणार आहे. सध्या इथं सत्तेत असलेल्या भाजपसाठी आपली सत्ता टिकवणं हे मोठं आव्हान असणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीला आता चांगलाच रंग चढायला लागला आहे. कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांनी थेट आव्हान दिलं आहे. योगींविरोधात गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. (UP elections 2022 Bhim Army chief Chandrashekhar Azad to contest against Yogi Adityanath)

चंद्रशेखर आझाद यांनी गेल्या आठवड्यात समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अखिलेश यादव यांच्याकडून आपला अपमान झाल्याचं सांगत आझाद समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर आता आझाद समाज पार्टीकडून अधिकृतरित्या चंद्रशेखर आझाद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ते गोरखपूर मतदारसंघातून लढतील असंही जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा पारंपारिक मतदारसंघ असून यंदा ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, समाजवादी पार्टीसोबत बिनसल्यानंतर आझाद समाज पार्टीनं उत्तर प्रदेशात ३३ जागांवर निवडणूकीची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT