Telangan Ban Potato From Agra
Telangan Ban Potato From Agra e sakal
देश

निवडणूक रणधुमाळीत बटाट्याने तापवलं राजकारण; प्रचारावरून औवेसींना सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) रणधुमाळीत बटाट्यावरून राजकारण तापल्याचं दिसतंय. कारण, उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आमच्या बटाट्यांवर बंदी घालणाऱ्या तेलंगणातील सरकारला पाठिंबा देणारे एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) आमच्या इथं प्रचार कसा काय करू शकतात? असा सवाल उपस्थित केला आहे. याबाबत तेलंगणात देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मोहम्मद आलमगीर हे आग्रा येथील बटाटा उत्पादक शेतकरी समितीचे सरचिटणीस आहेत. ते सहा एकर शेतात बटाट्याचे उत्पादन घेतला. दररोज सुमारे १०० ट्रक बटाट्यांची उत्तर प्रदेशातून निर्यात केली जाते. हे सर्व बटाटे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूला निर्यात केले जातात. यापैकी ५०-६० ट्रके बटाटे हे एकट्या आग्रा येथून निर्यात होतात, असं आलमगीर सांगतात. त्यांनीच ओवैसींना प्रचारावरून सवाल केला आहे.

उत्तर प्रदेशचे शेतकरी ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत बटाट्याची लागवड करतात आणि 20 फेब्रुवारी-10 मार्चपर्यंत त्याची काढणी करतात. काढणीच्या काळात ते पिकाच्या फक्त पाचव्या भागाचीच विक्री करतात. उर्वरीत बटाटा नोव्हेंबरपर्यंत स्थिर विक्रीसाठी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात. त्यावरूनच तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याने केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे. “आता यूपीमधून येणारे बटाटे हे कोल्ड स्टोअरमध्ये ठेवलेले गेल्या वर्षीचे उत्पादन आहे. तेलंगणात पिकवलेले ताजे बटाटे येथील रायथू बाजार भाजी मंडईत येत असताना आपण हे का खावे?” असा सवाल कृषी मंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी उपस्थित केला आहे.

तेलंगणा सध्या 3,500-4,000 एकरमध्ये बटाट्याचे उत्पादन घेत आहे. यापैकी जास्ती जास्त उत्पादन मुख्यतः रंगारेड्डी जिल्ह्यातील झहीराबाद भागात आहे. आम्ही हाती घेतलेल्या सिंचन प्रकल्पानंतर आमचे राज्य बटाटे पिकवण्यासाठी सर्वात योग्य आहे. एक लाख एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र वाढवण्यास वाव आहे. पण, त्यासाठी थोडा वेळ लागेल. आमच्याकडे ताजे बटाटे उपलब्ध असताना आम्ही आग्रा येथील कोल्ड स्टोरेज केलेल्या बटाट्यावर का अवलंबून राहायचे? असं निरंजन रेड्डी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT