Court Order File Photo
देश

कोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीला महिला वकील थेट फेसपॅक लावून हजर

ऑनलाईन पद्धतीने सुनावणीवेळी वकिलांना आपल्या ड्रेस कोडचा विसर पडल्याचेच या प्रकरणातून समोर येते.

सुशांत जाधव

कोरोनाच्या संकटामुळे कोर्टाच्या कार्यप्रणालीतही मोठा बदल झालाय. अनेक प्रकरणाची सुनावणी ही व्हर्चुअल पद्धतीने होत आहे. या दरम्यान एका महिला वकिलाने चेहऱ्यावर फेसपॅक लावून सुनावणीत सामील झाल्याचा प्रकार समोर आलाय. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन पद्धतीने सुनावणीवेळी वकिलांना आपल्या ड्रेस कोडचा विसर पडल्याचेच या प्रकरणातून समोर येते. उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालयातील ऑनलाईन सुनावणी वेळी हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणात कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून ऑनलाईन सुनावणीवेळी देखील विशेष ड्रेस कोडचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. (UP lawyers appear for virtual hearings in vests with face packs on Allahabad HC issues warning and dress code)

वर्ल्चुअल सुनावणी वेळी अनेक वकील रंगबेरंगी कपडे घालून युक्तीवाद करत आहेत. एवढेच नाही तर काहीजण स्कूटरवरुन तर काहीजण अंथरुणात आरामदायीरित्या ऑनलाईन सुनावणीत सहभागी होताना दिसते. एक महिला वकील चेहऱ्याला फेस पॅक लावून सुनावणीत सहभागी झाल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर अलाहबाद हाय कोर्टाने एक आदेश काढून वकिलांना ड्रेस कोड अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

या सर्व प्रकारानंतर अलाहबाद उच्च न्यायालयाने एक आदेश काढून वकिलांना ड्रेस कोड अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. आदेशानुसार, व्हर्चुअल माध्यमातून सुनावणीत सहभागी होताना पुरुष वकिलांनीना साधा पांढरा शर्ट तसेच महिला वकिलांनी पांढरी सलवार-पायजमा किंवा साडी घालावी, असे नमूद केले आहे. यासोबत नेक ब्रँड घालणं देखील अनिवार्य असेल. याशिवाय काळा कोट असेल तर उत्तमच असा उल्लेखही यात करण्यात आलाय.

अलाहबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश सौरभ श्याम शमशेरी यांच्या वर्चुअल सुनावणी दरम्यान एक वकील रंगबेरंगी कपडे घालून सहभागी झाले होते. यावर न्यायालयांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय की, अलाहबाद उच्च न्यायालयासह इत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवेळी काही वकील बनियान, रंगबेरंगी कपडे, पुजेच्या कपडे, स्कूटर चालवत, कारमधून प्रवास करत असताना व्हर्चुअल सुनावणीत सहभागी होत आहेत. आदेशात पुढे म्हटलंय की एक महिला वकिल महाशया तर चक्क फेस पॅक लावून सुनावणीत सहभागी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. कोविडमुळे आपल्याला अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागत असून महिला वकिलांना कोट आणि गाउन घालून सुनावणीत सहभागी होण्यातून सूट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT