कोरोना 
देश

कोरोनामुळे UP मधील मंत्र्याचं निधन

नामदेव कुंभार

Coronavirus UP Update : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेने उत्तर प्रदेशमध्ये हाहा:कार माजवलाय. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेत्यांनाही याचा फटका बसला आहे. योगी आदित्यनाथ रकारमधील पूर आणि नियंत्रण राज्यमंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन झाले. 29 एप्रिल रोजी 56 वर्षीय विजय कश्यप यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून विजय कश्यप (vijay kashyap) यांनी कोरोनाविरोधात झुंज दिली. अचानक तब्येत बिघडल्याने कश्यप यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय कश्यप हे उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभेचे आमदार होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM yogi adityanath), उप मुख्यमंत्री केशव मौर्य यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

कोरोनामुळे निधन झालेले तिसरे मंत्री

विजय कश्यप कोरोनामुळे निधन झालेले उत्तर प्रदेशमधील तिसरे मंत्री आहेत. याआधी कमलरानी वरुण आणि चेतन चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.

सातव्या आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू -

उत्तर प्रदेशमधील सात आमदाराचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विजय कश्यप यांच्याआधी दल बहादूर कोरी, केसर सिंह, रमेश दिवाकर, सुरेश श्रीवास्तव, कमलरानी वरुण आणि चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Haveli News : १५ वर्षांनंतर यशवंत साखर कारखान्याच्या जमिन विक्रीला मुहूर्त; पुणे बाजार समितीकडून ४९.१८ एकर खरेदी

Hadapsar News : वयाची तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच 'इयारा'च्या नावे चौदा प्रकारचा दस्तऐवज

'Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघातूनच मी वगळलं असतं...' श्रीलंकेविरुद्धच्या भांडणानंतर संजय मांजरेकरांचं खळबळजनक भाष्य

काळाचा थरकाप उडवणारा दिवस! माळीण दुर्घटनेवर आधारित 'एक होतं माळीण' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार!

बँकेपेक्षा जास्त व्याज, जोखीम शून्य! पोस्ट ऑफिसपासून PPF पर्यंत... 'या' ५ सरकारी योजनांमध्ये मिळतोय आकर्षक परतावा

SCROLL FOR NEXT