gazipur police
gazipur police ani
देश

Video: ''गंगेत मृतदेह सोडू नका, अंत्यसंस्कारासाठी आम्ही पैसे देऊ''

कार्तिक पुजारी

लखनऊ- गंगा नदीमध्ये (Ganga river) मृतदेह आढळल्याच्या बातमीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खळबळ उडाली होती. गंगेमध्ये 100 पेक्षा अधिक मृतदेह आढळून आले होते. कोरोनाबाधित मृतांना नदीमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर गाझीपूर पोलिसांनी गंगा किनाऱ्यावर असणाऱ्या नागरिकांना आवाहन केलं आहे. कृपया मृतदेहांना गंगेच्या पाण्यामध्ये सोडू नका, त्यांच्यावर योग्यपणे अंत्यसंस्कार (cremation) करा. जर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणाकडे पैसे नसतील, तर आम्हाला कळवा. आम्ही सर्वप्रकारची सोय करु, असं पोलिस म्हणाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी गंगा नदीमध्ये एका बोटीत बसून हे आवाहन केलं. एएनआयने यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. (up police official makes announcement water burial of bodies into Ganga river cremation)

गंगा नदीच्या (Ganges) पात्रामध्ये मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची (Dead bodies floating in Ganges) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (Human Rights Commission) आज गंभीर दखल घेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि बिहार सरकारला नोटिसा ((Notice) बजावल्या आहेत. याबाबत चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा, असे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात उजियार, कुल्हादिया आणि भारौली घाटावर ५२ मृतदेह आढळून आले होते. बिहारमध्येही अशाच पद्धतीने मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीमध्ये 70 हून जास्त तरंगणारे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. एकीकडे या मृतदेहांच्या संख्येवरूनही वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींनी ही संख्या 100 पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर आता गंगा नदीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरेल अशी शक्यता वर्तवत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मृत शरीरामधून कोरोना पसरले अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT