twitter 
देश

उत्तर प्रदेश पोलिसांची 'Twitter'च्या प्रमुखांना नोटीस

भाग्यश्री राऊत

नवी दिल्ली : एका मुस्लिम वृद्धावरील हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर (assault video viral on twitter) व्हायरल झाला होता. त्यानंतर गाझियाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता उत्तरप्रदेश पोलिसांनी (UP police) ट्टिटर इंडियाच्या प्रमुखांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ट्विटरचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी (twitter india MS manish maheshwari) यांना दिल्लीजवळील लोणी बॉर्डर पोलिस ठाण्यात (loni border police station) सात दिवसांत हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत एनआयने ट्विटर करून माहिती दिली आहे. (up police send notice to twitter india head on viral assault video case)

काहीजण ट्विटर हँडलचा वापर समाजात द्वेष पसरविण्यासाठी करतात. त्यावर ट्विटर काहीही कारवाई करत नसल्याचे यामध्ये म्हटले आहे. तसेच असामाजिक संदेश असेच व्हायरल होऊ दिलेत, असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुस्लिम वृद्धावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. त्यानंतर राजकीय नेते, पत्रकार आणि ट्विटरवर गाझियाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच उत्तर प्रदेश पोलिसांनी ही नोटीस पाठविली आहे.

''बळजबरीने माझी दाढी कापली असून मला वंदे मातारम आणि जय श्री राम असे म्हणण्यास सांगितले'', असा आरोप सुफी अब्लुद सामद या व्यक्तीने केला होता. यामध्ये कुठलीही धार्मिक किनार नसून हिंदू आणि मुस्लिस अशा दोन्ही धर्मातील सहा लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. बनावट गोष्टी विकल्यामुळे त्याच्यावर राग होता, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले होते. मात्र, अब्दुल सामद यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचा दावा फेटाळून लावला होता. ''माझ्या वडिलांच्या व्यवसायाबाबत पोलिसांनी चुकीची माहिती दिली. आमच्या घरातील कोणीही असा व्यवसाय करत नाहीत. आम्ही सुतारकाम करतो. पोलिस चुकीचे बोलत आहेत. त्यांनी चौकशी करून ते सिद्ध करून दाखवावे'', असे अब्दुल यांचा मुलगा बबलू सैफी यांनी सांगितले होते.

ट्विटरने आज दुपारी चार वाजता संसेदत हजर राहून सोशल मीडिया आणि ऑनलाइन बातम्यांचा गैरवापर कसा रोखायचा याबाबत निवदेन देण्याचे आवाहन संसदेच्या पॅनेलने केले आहे. दरम्यान, माहेश्वरी यांना काँग्रेस टूलकिटप्रकरणी देखील दिल्ली पोलिसांनी विचारपूस केली होती. ट्विटरच्या दिल्ली कार्यालयात भेट दिल्यानंतर दिल्ली पोलिसांची एक टीम ही बंगळुरूला माहेश्वरी यांना विचारपूस करण्यासाठी गेली असल्याचीही माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT