UP Police Hindu Panchang Esakal
देश

UP Police Hindu Panchang: अजब! गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारकडून पोलिस स्टेशनला पंचांग; अमावस्या पाहून घालणार गुन्ह्यांना आळा

गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आता पंचांगानुसार काम करणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

गुन्हेगारी आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आता पंचांगानुसार काम करणार आहेत. उत्तर प्रदेशच्या डीजीपीने रात्रीच्या अंधारात होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जारी केलेल्या परिपत्रकात, स्टेशन प्रभारींनी हिंदू कॅलेंडरच्या अमावास्येच्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर विशेष दक्षता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात घडलेल्या घटनांचे क्राईम मॅपिंग करावे असेही सांगण्यात आले आहे.(Latest Marathi News)

त्यांच्या परिपत्रकासह, डीजीपीने हिंदू कॅलेंडरची एक प्रत देखील सर्व अधिकाऱ्यांना पाठवली आहे. जेणेकरून त्यांना अमावस्या कधी येते आणि आणखी गुन्हे कधी होतील हे त्यांना कळेल. डीजीपी विजय कुमार यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे की, कृष्ण पक्षाच्या अमावास्येच्या 1 आठवडा आधी आणि 1 आठवडा नंतर रात्रीच्या वेळी अधिक घटना घडतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर हे विश्लेषण दर महिन्याला व्हायला हवे.

'रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे करावी'

डीजीपीने जारी केलेल्या परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, अमावस्या 16 ऑगस्ट, 14 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि त्याच्या एक आठवडा आधी आणि नंतर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. अमावस्येच्या एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर क्राइम मॅपिंग करावे. रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे करावी, असे सांगण्यात आले आहे.(Latest Marathi News)

तर डीजीपी विजय कुमार म्हणाले की, गुन्हेगारीला प्रभावीपणे रोखणे हे पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सतर्कतेच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले पाहिजे. यासाठी रात्रीची गस्त अधिक प्रभावीपणे करणे आवश्यक आहे जेणेकरून सामान्य जनतेमध्ये त्यांच्या सुरक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण होईल.(Latest Marathi News)

डीजीपींना अहवाल पाठवणार

सध्या डीजीपी विजय कुमार यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार अमावास्येच्या एक आठवडा आधी आणि एक आठवड्यानंतर झालेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. लवकरच अनेक जिल्हे अमावस्येवरील घटनांचे अहवाल डीजीपी मुख्यालयाला पाठवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात २० फेब्रुवारीला ग्रामपंचायतींचे 'कामबंद', प्रशासक नेमणुकीवरून सरपंच परिषदेची आंदोलनाची हाक

IND vs PAK: मोहसीन नक्वींनी पाकिस्तान हरतंय लक्षात येताच केला पोबारा; गाडीत बसून पसार होतानाचा Video Viral

बिग बॉस आता राखीची वाट लावणार! कन्फेशन रुममध्ये बोलावून हाताला खेचत बाहेर काढलं? घरात नक्की काय घडलं?

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT