देश

Video|...अन् उमेदवारी अर्ज घेऊन धावत निघाले युपीचे क्रीडा मंत्री

क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी यांची धावपळ पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सध्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections 2022) तयारी सुरु झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज न भरलेल्या सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आज धावपळ सुरु केली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री उपेंद्र तिवारी (Sports Minister Upendra Tiwari) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तिवारी यांनी बलिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उशीर झाल्याने पळतच कार्यालय गाठल्याचं दिसतंय. (Sports Minister Upendra Tiwari Sprinted Video)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायची मुदत आहे. मात्र अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठी असल्यानं त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे उपेंद्र तिवारी यांनी धावत कार्यालय गाठल्याचं दिसतंय. ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर भन्नाट प्रतिक्रीया आल्याचं दिसतं आहे. ते क्रीडा मंत्री असल्यानं धावणं हे त्यांचं कामच असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT