देश

Viral Video: दुकानाबाहेरचा बल्ब चोरणारा पोलिस अधिकारी निलंबित, व्हिडीओमुळे कारवाई

सकाळ डिजिटल टीम

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर पोलीस स्टेशन परिसरात पोलिस अधिकाऱ्याने बल्ब चोरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्रकरणाची दखल घेत आता आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. (Viral Video news in Marathi)

फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात इन्स्पेक्टर राजेश वर्मा यांची ड्युटी रात्रीची होती. त्या दिवशी दसऱ्याची जत्रा होती. ही घटना ६ ऑक्टोबरची आहे. प्रतापपूर बॅरिअरवर तैनात असलेला पोलिस अधिकारी एका बंद दुकानात पोहोचला आणि आजूबाजूला पाहून तेथे लावलेला बल्ब चोरून खिशात टाकून चालत राहिला. मात्र पोलिस अधिकाऱ्याची ही कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे त्याला माहित नव्हते.

सकाळी दुकानात बल्ब नसल्याचे दुकानदाराच्या लक्षात आल्यावर त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलीस विभागातील उच्चपदस्थांनी आरोपी कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले.

हवालदार पदावरून बढती मिळून आरोपी पोलिस निरीक्षक झाला होता. मागील आठ महिन्यांपासून तो फुलपूर पोलिस ठाण्यात तैनात होता. निलंबित राजेश वर्मा यांनी म्हटलं की, ज्या ठिकाणी ते ड्युटी करत होते तेथे अंधार असल्याने त्यांनी तेथून बल्ब काढून तेथे लावला होता. सध्या या निरीक्षकाविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कानपूरमध्येही पोलिसांचे लज्जास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. ज्यात रात्रीच्या गस्तीदरम्यान एका पोलिसाने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT