Ludo game mobile phones Sakal
देश

Ludo च्या व्यसनापायी तिने स्वतःलाच लावलं पणाला; जे घडलं ते ऐकून नवरा हादरला!

गेमच्या वेडाची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील, पण हे जरा भलतंच आहे.

सकाळ डिजिटल टीम

मोबाईल गेमिंगचं व्यसन लागणं ही काही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. पण उत्तर प्रदेशातल्या एका महिलेने गेमिंगच्या नादात आपलं सर्वस्वच गमावलं आहे. गेमिंगवर पैसे लावता लावता हिने स्वतःलाच पणाला लावलं आणि हरलीसुद्धा.

उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये ही घटना घडली आहे. रेणू नावाच्या महिलेला लुडो गेमचं व्यसन लागलं होतं. ती तिच्या घरमालकासोबत नेहमी लुडो खेळायची. एक दिवस असंच खेळता खेळता दोघांनी गेमवर पैसे लावायचं ठरवलं. पण काही वेळानंतर ही महिला सगळे पैसे हरली. शेवटी गेमच्या नादात तिने स्वतःलाच पणाला लावलं, अन् स्वतःलाही हरलं.

हा सगळा प्रकार रेणूने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर पती लगेचच प्रतापगढला आला आणि त्याने पोलिसांत तक्रार दिली. घडल्या प्रकाराबद्दल त्याने सोशल मीडियावर लिहिलं. रेणूच्या पतीने सांगितलं की, तो देवकली इथं एका भाड्याच्या घरात राहत होता. सहा महिन्यांपूर्वी तो कामाच्या निमित्ताने जयपूरला गेला आणि तो पत्नीला कायम पैसे पाठवायचा. हे पैसे तिने सट्टा खेळण्यासाठी वापरले. पैसे संपल्यावर तिने स्वतःला पणाला लावलं आणि स्वतःलाही हरून बसली.

या जोडप्याला दोन मुलंही आहेत. आता घडल्या प्रकारानंतर ही महिला घरमालकासोबत राहत आहे. पतीने तिला अनेकदा घरी परतण्याची विनंती केली, पण ही महिला आता घरमालकाला सोडायला तयार नाही. पोलीस सध्या घरमालकाचा तपास करत आहेत आणि पुढील चौकशीही करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT