Bihar News 
देश

Bihar News : विजेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार; दोघांचा मृत्यू

रवींद्र देशमुख

पाटणा : बिहारमधील कटिहारमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कटिहारमधील बारसोई येथील आहे. गोळी लागल्यामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये मोहम्मद खुर्शीद आणि सोनू यांचा समावेश आहे. आपल्या गावात वीज पुरवठा व्हावा यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक विजेच्या समस्येबाबत आंदोलन करत असताना ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, निदर्शनादरम्यान लोक आक्रमक झाले होते. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीला पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. यासोबतच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमही करण्यात आले आहे.

पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याची माहिती मिळताच राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री विजेंद्र प्रसाद यादव यांनी म्हटले की, जर कोणी दुष्कृत्य केले तर त्याच्यावर लाठ्या किंवा गोळ्या झाडाव्या लागतात. बारसोई येथील या घटनेत निदर्शने करणारे लोक संतप्त झाल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे दुसरा पर्याय नव्हता.

ते म्हणाले की, पोलिसांनीही आंदोलकांना शांततेने आंदोलन करण्यास सांगितले होते, मात्र आंदोलक आक्रमक झाले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले. दुसरीकडे, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

Kinwat News : किनवट तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार; प्राथमिक विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प?

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

SCROLL FOR NEXT