UPSC CSE 2024 esakal
देश

UPSC CSE 2024: लोकसभा निवडणुकीमुळे UPSC परीक्षा पुढे ढकलल्या, 26 मे पासून होणार होत्या परीक्षा, पाहा नोटीस

UPSC CSE 2024: लोकसभा निवडणुकीमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीची तारीख आणि UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षेची तारीख सारखीच आली होती.

Sandip Kapde

UPSC CSE 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा 26 मे रोजी होणार होती. लोकसभा निवडणुकीमुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे. वास्तविक, लोकसभा निवडणुकीची तारीख आणि UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षेची तारीख सारखीच आली होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे.

UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा आता कधी घेतली जाईल?

परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आयोगाने नवीन तारीखही जाहीर केली आहे. UPSC CSE 2024 प्रिलिम्स परीक्षा आता 16 जून 2024 रोजी घेतली जाईल. तर UPSC CSE 2024 ची मुख्य परीक्षा 20 सप्टेंबर ते 05 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतली जाईल. UPSC CSE 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2024 होती. अर्जातील दुरुस्तीसाठी 7 मार्च ते 13 मार्च 2024 ही मुदत देण्यात आली होती. UPSS पूर्व परीक्षेसाठी एकूण 80 केंद्रे घेतली जातील आणि मुख्य परीक्षा एकूण 24 केंद्रांवर घेतली जाईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केल्या. लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान सात टप्प्यात होत आहे. तर निकाल 4 जूनला जाहीर होतील. त्यामुळे या दरम्यान UPSC च्या होणाऱ्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

UPSC ने CSE परीक्षेसाठी एकूण 1,056 जागा आणि भारतीय वन सेवेसाठी (IFoS) 150 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. UPSC CSE साठी पात्र अर्जदारांचे मूल्यमापन प्राथमिक, मुख्य आणि व्यक्तिमत्व चाचणी या तीन टप्प्यांवर आधारित असेल. UPSC CSE च्या प्राथमिक परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. निर्दिष्ट कट-ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणारे इच्छुक UPSC CSE मुख्य परीक्षा 2024 साठी नोंदणी करण्यास पात्र ठरतील. अधिक तपशिलांसाठी उमेदवारांना UPSC वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT