देश

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

संतोष कानडे

UPSC Prelims 2024 : आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात AIचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतंय. शाळेचा गृहपाठ असो की हेल्थ रिपोर्ट असोत.. एआय टूल्सची सर्वत्र मदत होतेय. अॅप्सच्या माध्यमातून अवघड परीक्षेचे पेपर सॉल्व्ह करुन त्यातून अभ्यासात भर टाकली जातेय.

मागच्या वर्षी चॅट जीपीटी यूपीएससी परीक्षेत नापास झालं होतं. त्यामुळे अनेकजण खूश झाले होतो की, एआय अजून इतकं सक्षम नाही, ते अवघड परीक्षा पास होऊ शकत नाही. परंतु आता AI App PadhAI ने जगाच्या अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी प्रीलिम्स पास केली.

नुकत्याच २०२४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत AI App PadhAI ने २०० पैकी १७० गुण मिळवले. एवढंच नाही तर PadhAI App ने सात मिनिटांत पेपर सोडवला. एआयने केलेल्या या कमालीमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

'PadhAI' ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. आयआयटीयन्सच्या टीमने हे अॅप तयार केले आहे. रविवारी UPSC प्रिलिम्स परीक्षा 2024 संपल्यानंतर, PadhAI ने दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये सार्वजनिकपणे हजेरी लावली होती. विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेला UPSC समुदाय, शिक्षण क्षेत्र आणि मीडियाशी संबंधित लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम YouTube आणि livestream.padhai.ai वर लाइव्ह देखील करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT