Tushar Uttam Desai
Tushar Uttam Desai esakal
देश

कऱ्हाडच्या तुषारची IPS पदाला गवसणी; देशात पटकावली 224 वी रॅंक

हेमंत पवार

तुषार देसाईने पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी घालून देशात २२४ वा क्रमांक पटकावून आयपीएसपदी (IPS) मजल मारलीय.

कऱ्हाड (सातारा) : चिकाटी, सहनशीलता आणि संयमाच्या जोरावर आणे (ता. कऱ्हाड) येथील तुषार उत्तम देसाई (Tushar Uttam Desai) या युवकाने पाचव्या प्रयत्नात यशाला गवसणी घालून देशात २२४ वा क्रमांक पटकावून आयपीएसपदी (IPS) मजल मारलीय. एक-दोन वेळा अपयश आल्यामुळे खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न करा, यश हमखास मिळते, असा सल्लाही तुषार याने तरुणांना दिलाय.

आणे गावचे सुपुत्र (कै.) निवृत्ती मारुती देसाई यांचा नातू आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता उत्तम देसाई यांचा सुपुत्र तुषारचे माध्यमिक शिक्षक शिक्षण मंडळ कऱ्हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. तो स्कॉलरशिपमध्ये राज्यात प्रथम आला होता. 2015 मध्ये सीओईपीमधून बीटेक मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. 2018 पासून नाबार्डला तो अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कॉलेज जीवनापासूनच त्याने आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याने शिक्षण पूर्ण करत असतानाच संयम, सहनशीलता आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (Central Public Service Commission Examination) दिली. त्यात त्याला यश आले नाही. मात्र, त्याने खचून न जाता पुन्हा परीक्षा दिली. त्यामध्येही त्याला मुलाखतीत अपयश आले. मात्र, त्यावेळी तो थोडा खचला.

मात्र, त्याचे वडील शाखा अभियंता देसाई, आई रंजना देसाई आणि बहीण तेजस्विनी देसाई-मोरे यांच्यासह त्याचे चुलते, मामांनी त्याला कितीही अपयश आले तरीही खचून न जाता अभ्यास करुन तू हमखास यश मिळवशील हे त्याच्या मनावर कोरले. त्यातून त्याने जिद्दीने पुन्हा अभ्यास सुरु करुन पुन्हा त्याने परीक्षा दिली. त्यावेळी त्याला पाचव्या प्रयत्नात आयपीएसपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. शालेय जीवनापासूनच अतिशय हुशार, नम्र आणि अबोल असलेला तुषार आजच्या निकालतून सुपर क्लासवन अधिकारी बनलाय. कऱ्हाड तालुक्यातील कोळे विभागातील आणि आणे गावातील तो पहिला आयपीएस अधिकारी बनला असून त्याच्या यशाबद्दल ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

सख्ये मावस भाऊ आयपीएस

तुषार देसाई याने देशातून २२४ व्या क्रमांकावर बाजी मारुन आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. त्यादरम्यान २०१९ मध्ये तुषार यांचा सख्खा मावस भाऊ गिरीष यादव यानेही आयपीएसपदी मजल मारलीय. त्याचे सध्या केंद्रीय अॅकॅडमीत प्रशिक्षण सुरु आहे. त्याची तामिळनाडू राज्यासाठी आयपीएस म्हणून निवड झाली आहे. दोन्ही सख्या मावस भावांनी मिळवलेले यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT