Prime Minister Narendra Modi criticize Congress policy to rule politics sakal
देश

UPSC Result: युपीएससीत यश मिळवणाऱ्या उमेदवारांचं PM मोदींकडून शुभेच्छा; दिला खास संदेश

या परीक्षेत ९३३ उमेदवार पात्र ठरले असून पहिल्या चार स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगाच्या अर्थात युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत ९३३ उमेदवार पात्र ठरले असून पहिल्या चार स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांना शुभेच्छा देताना खास संदेशही पंतप्रधानांनी दिला आहे. (UPSC Result wishes from PM Modi to successful candidates Special message given)

PM मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं, युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांचं अभिनंदन. त्यांच्या पुढील यशस्वी आणि समाधानकारक भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा. देशाची सेवा करणं तसेच लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा एक खूपच चांगला आणि रोमांचकारी काळ आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, युपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया रँकमध्ये पहिल्या चार स्थानावर महिलाच आहेत. यांपैकी इशिता किशोर हीनं पहिली रँक मिळवली आहे. तर महाराष्ट्रातून ठाण्याच्या डॉ. कश्मीरा संखे या पहिल्या आल्या आहेत. संखे यांचा ऑल इंडिया रँक २५ आहे.

यंदाच्या परीक्षेतही मुलींनी आपला दबदबा कायम राखला असून यातील अनेक उत्तीर्ण उमेदवारांनी कुठल्या प्रकारचा खासगी क्लास न करता घरीच अभ्यास करुन घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळं या कठीण परिस्थितीचा सामना करत यश मिळवलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर मोठं समाधान दिसतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT