Urfi Javed esakal
देश

Urfi Javed: राहुल गांधींना ट्रोल केल्याने भाजप नेत्यावर उर्फी जावेद भडकली, म्हणाली...

उर्फी जावेद थेट भाजप नेत्याला भिडली

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. मात्र, सध्या ती एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. नेहमी तिला तिच्या कपड्यावरुन ट्रोल केलं जात. अशातच, एका भाजप नेत्याने राहुल गांधींची तुलना थेट तिच्याची केल्याने ती भलतीच भडकली आहे. तिने ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे. (Urfi Javed slammed BJP politician Rahul Gandhi t shirt )

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी चर्चेत आहेत. राहुल गांधी सध्या दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही टी-शर्टवर यात्रेमध्ये फिरत आहेत. त्यामुळे ‘राहुल गांधींना थंडी वाजत नाही का?’ असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यानंतर भाजप नेते दिनेश देसाई यांनी ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींवर उपहासात्मक ट्वीट करण्यात आलं आहे.

“जर थंडीमध्ये फक्त एक टीशर्ट घातल्यामुळे राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होण्यासाठी पात्र होणार असतील, तर मग उर्फी जावेद तर अमेरिकेची राष्ट्रपतीच असायला हवी. असं देसाई यांनी म्हटल आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर उर्फीने ट्विट करत देसाई यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाली उर्फी?

“हे तुमचे राजकारणी आहेत का? काहीतरी चांगलं करा! अशा लोकांकडून महिलांना सुरक्षा पुरवण्याची अपेक्षा कसी करू शकतो आपण?” असा सवालच उर्फीनं विचारला आहे.

उर्फीच्या या ट्विटनंतर देसाई यांनी आणखी एक ट्विट करत तिला उत्तर दिले आहे. “भारताची संस्कृती किंवा महिलांचा सन्मान याच्याशी संबंधित महिलेचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रेरणास्रोत आहेत. तुमचे सोशल मीडिया फोटो आणि व्हिडीओ नाही”, असं ट्वीट देसाई यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

मुरांबा फेम अभिनेत्रीला वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी झालेला भयंकर आजार; मरणप्राय वेदना आणि अवघड परिस्थिती

Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील राम दरबार आता 'राम परिवार' नावाने ओळखला जाणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती प्राणप्रतिष्ठा!

Municipal Election : प्रभाग १० चे वेगळेपण! रिंगणात एकही अपक्ष नाही; प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Rishabh Pant: न्यूझीलंड मालिकेआधीच भारतीय संघासाठी वाईट बातमी! ऋषभ पंतला दुखापत; अचानक मैदान सोडावं लागलं, काय घडलं?

SCROLL FOR NEXT