US President Joe Biden will meet PM Narendra Modi G20 Summit today over dinner  sakal
देश

G20 Summit 2023 : बायडन आज PM मोदींसोबत करणार डिनर; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

रोहित कणसे

G20 Summit 2023 in Delhi : नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना डिनरसाठी आमंत्रित केले आहे. शुक्रवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी ७.३० वाजता दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जो बिडेन संध्याकाळी भारतात पोहोचतील आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत डिनर करतील. दोन्ही नेत्यांमध्ये आज द्विपक्षीय बैठकही होणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो बायडन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २०२० मध्ये भारतात आले होते. बायडन आणि पीएम मोदी यांचे ही दुसारी डिनर दरम्यानची भेट असेल. तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान बायडन यांनी त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनरचे आयोजन केले होते. दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

दोन्ही नेत्यांनी क्लीन एनर्जी, व्यापार, उच्च तंत्रज्ञान, संरक्षण यांसारख्या क्षेत्रात सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेणे अपेक्षित आहे. यासोबतच जगातील काही गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देश कसे योगदान देऊ शकतात यावरही ते चर्चा करू शकतात. दोन्ही देशांचे नेते या चर्चेदरम्यान व्हिसा प्रणाली आणखी सर्वसमावेशक करण्याबाबतही चर्चा करू शकतात.

G20 काय आहे?

जी-२० सदस्य देशांचा समुह असून हा जागतिक GDP च्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या बातीत ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. जी-२० देशांच्या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT