प्रियांका गांधी  sakal
देश

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

मध्य प्रदेशातील गुणा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ ः ‘‘मतांच्या हव्यासापोटी गांधी या आडनावावर नकली गांधी मते मागत फिरत आहेत,’’ अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांच्यावर शनिवारी टीका केली. मध्य प्रदेशातील गुणा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

‘देशातील नागरिकांनी कष्टाने कमावलेली संपत्ती काँग्रेस पक्ष घुसखोरांना आणि भरपूर मुले असणाऱ्यांना देण्याची योजना आखत आहे, महिलांच्या मंगळसूत्रावरही त्यांना घाला घालायचा आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका सभेमध्ये केला होता. त्यानंतर यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली. सोनिया गांधी यांनी देशासाठी त्यांचे मंगळसूत्र दिले आहे असे विधान प्रियांका गांधी यांनी या आरोपाच्या प्रत्युत्तरादाखल केले होते. त्याचा संदर्भ घेत मोहन यादव यांनी प्रियांका यांच्यावर टीका केली. ‘‘ आपल्याकडे मुलीचे लग्न करून तिची पाठवण केली की तिचे आडनाव बदलते, परंतु मतांसाठी हे लोक अजूनही गांधी आडनावच वापरत आहेत, प्रियांका या अजूनही गांधी आडनाव कसे लावतात’’ असा सवाल यादव यांनी उपस्थित केला.

मंगळसूत्रावरूनही टीका

मोहन यादव यांनी प्रियांका गांधी यांच्यावर मंगळसूत्राबाबतही टीका केली.‘‘जवाहरलाल नेहरू हे दुःखी असतील कारण त्यांच्या वंशातील व्यक्ती ही मंगळसूत्रही घालत नाही,’’ असे यादव म्हणाले.

काँग्रेसकडून प्रत्युत्तर

यादव यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे नेते के.के. मिश्रा आणि जितू पटवारी यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. मंगळसूत्र न घालणे हा काही गुन्हा आहे की घटनाबाह्य कृती आहे? असा सवाल काँग्रेस नेते पटवारी यांनी विचारला आहे. आडनावावरून टीका करणाऱ्यांनी प्रियांका यांचे ‘एक्स’वरील अकाउंट तपासून पाहावे त्यावर वद्रा असेही लिहिले आहे, असेही पटवारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT