Adhir Ranjan Chaudhary Marathi News Adhir Ranjan Chaudhary Marathi News
देश

'.. तर सार्वजनिक जीवन सोडून देईन'; अधीर रंजन चौधरी यांची निलंबनावरील निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया

कार्तिक पुजारी

Suspension from Lok Sabha revoked Congress MP Adhir Ranjan Chowdhury

नवी दिल्ली- काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे संसदेतील निलंबन मागे घेण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयानं याबाबतचं अधिकृत पत्र प्रसिद्ध करुन याची माहिती दिली. बुधवारी (३० ऑगस्ट) रोजी लोकसभेच्या समितीपुढं अधीर रंजन चौधरींनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर त्यांचं निलंबन रद्द करण्याची शिफारस मंजूर करण्यात आली. निलंबनावरील निर्णयानंतर चौधरी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

मी काही चुकीचं बोललं असेल तर सार्वजनिक जीवन सोडून देईन. माझं म्हणणं ते समजू शकले नसतील असं मला वाटतं. कारण संसदेत जे मी म्हटलं होतं ते योग्य आणि नियमाला धरुन होतं. कायद्याच्या विरोधात असं काहीही मी बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा अर्थ त्यांना नीट लावता आला नाही. मला संसदेत स्पष्टीकरण विचारलं असतं तर मी तेथेच त्यांना स्पष्टीकरण दिलं असतं, असं ते म्हणाले.

सत्ताधारी काही नेत्यांनी पंतप्रधानांना खूष करण्यासाठी माझ्यावर टीका करायला सुरुवात केली. संसदेत बोलण्याचा अधिकार आहे. नियमानुसारच आम्ही बोलत असतो. पण, सत्ताधाऱ्यांना ते आवडेल, न आवडेल. काँग्रेसविरोधात जे अपशब्द वापरले जातात ते सर्व रिकॉर्डवर आहेत.सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व काँग्रेस नेत्यांविरोधात संसदेत अपशब्द वापरले जातात. याचा विचार कोण करेल, असं ते म्हणाले.

मी त्या दिवशीही सांगत होतो आणि आजही सांगतोय, संसदेत मी काही चुकीचं बोललो असेल तर मी पब्लिक लाईफ सोडून देईन. कारण मला पूर्ण विश्वास आहे मी काही चुकीचं बोललो किंवा चुकीचा शब्द वापरला नाही. कोणाला त्रास देण्यासाठी आम्ही संसदेत बोलत नाही, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.

संसदेत चुकीच्या वर्तनाचा ठपका अधीर रंजन चौधरी यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर अधीर रंजन चौधरी विशेषाधिकार समितीकडे गेले होते.लोकसभेच्या समितीनं चौधरींचं निलंबन रद्द करुन त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्याची शिफारस केली . त्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांना पुन्हा खासदारकी बहाल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT