बापरे! चक्क मुलाने खाल्ले 16 टूथब्रश अन् लोखंडी खिळे esakal
देश

बापरे! चक्क मुलाने खाल्ले 16 टूथब्रश अन् लोखंडी खिळे

मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलाच्या पालकांनी नको तो उपाय केला.

सकाऴ वृत्तसेवा

मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलाच्या पालकांनी नको तो उपाय केला.

आपल्या आजुबाजूला काहींना कोणती ना कोणती वाईट सवय ही असतेच. परंतु या वाईट सवयीमुळे आपल्या शरीराला त्याचा परिणाम होऊ शकतो, याचा विचार केला जात नाही. मग त्यावेळी एखाद्या सवयीपासून जर सुटका मिळवायची असेल तर काहीजण उपाय करु इच्छित असतात. असाच एक उपाय एका 14 वर्षीय मुलाने त्याची वाईट सवय सोडवण्यासाठी केला आहे. परंतु त्या मुलाचा हा उपाय सर्वांना थक्क करणारा ठरला आहे. उत्तर प्रदेशमधील या मुलाने चक्क लोखंडी खिळे आणि टूथब्रश खाल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय धक्कादायक ठरली आहे.

उत्तर प्रदेशमधील या मुलाचे नाव हरिश देवी असे आहे. त्या मुलाला लहानपणापासून माती खाण्याची सवय. या मुलाची ही सवय कायम अशीच राहिली. या सवयीमुळे त्याच्या कुटुंबाने अनेक उपाय केले. शेवटी सगळ्या उपायांना कंटाळून त्या मुलाच्या कुटुंबाने एका मांत्रिकाकडे त्याला घेऊन गेले. त्यावेळी मांत्रिकाने या मुलाची माती खाण्याची ही वाईट सवय सोडण्यासाठी लोखंडी खिळे आणि टूथब्रश खाण्याचा सल्ला दिला. आणि त्या मुलाने मांत्रिकाने सांगितल्यामुळे ते खायला सुध्दा सुरुवात केली. हे खाण्याने मुलाच्या शरीरामध्ये त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली. एका रिपोर्टनुसार, हे खाल्ल्याने मुलाच्या पोटामध्ये प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी त्या मुलाची डॉक्टरांनी तपासणी केली. तेव्हा त्याचा रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टर चक्रावून गेले. त्या मुलाच्या पोटामध्ये लोखंडी खिळे आणि टूथब्रश दिसत होते. हे पाहून डॉक्टरांनी लगेच त्या मुलाचे ऑपरेशन केलं. त्याच्या पोटामधून तब्बल 16 टूथब्रश आणि 3 इंच लांब लोखंडी खिळे काढले. त्या मुलाचे ऑपरेशन केल्यानंतर आता मुलाची स्थिती सधारत आहे, पुढील काही दिवसात त्या मुलाची तब्येत बरी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT