Pregnant Women HIV esakal
देश

धक्कादायक! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 80 महिला HIV पॉझिटिव्ह; 35 जणींनी दिला बाळाला जन्म

या सर्व महिलांवर एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लाजपत राय मेडिकल कॉलेजमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या ठिकाणी गेल्या १६ महिन्यांमध्ये तब्बल अशा ८० गर्भवती महिला प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या, ज्यांना एचआयव्हीची लागण झाली होती.

या सर्व महिलांवर एआरटी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनांवर मेरठ मेडिकल कॉलेज आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून नजर ठेवून आहे. (Uttar Pradesh 80 women who came for delivery were HIV positive)

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सर्व महिलांवर उपचार सुरु आहेत. सर्व महिला आणि त्यांनी जन्म दिलेली बाळं निरोगी आहेत. यांपैकी ३५ महिला अशा आहेत त्यांनी बाळांना जन्म दिल्याचं विविध माध्यमातील वृत्तांमधून समोर आली आहे.

पण अद्याप मेरठ मेडिकल कॉलेज प्रशासन आणि जिल्हा मुख्य चिकित्सा अधिकाऱ्यांनी नेमक्या किती एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांनी बाळांना जन्म दिला याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. (Latest Marathi News)

दरम्यान, मेरठच्या लाला लजपत राय मेडिकल कॉलेजच्या एआरटी सेंटरच्या (अँटी रेट्रोव्हायरल थेरपी) माहितीनुसार, गेल्या सोळा महिन्यात अत्तापर्यंत एकूण ८१ महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. यांपैकी ३५ महिला आधीपासूनच या आजारानं ग्रस्त होत्या. (Marathi Tajya Batmya)

बाळांची होणार तपासणी

२०२२-२३ मध्ये एकूण ३३ नवी एचआयव्हीची प्रकरणं प्रसूती दरम्यान समोर आली आहेत. या वर्षी जुलैमध्ये १३ गर्भवती महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं होतं. एआरटी सेंटरच्या नोडल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता या महिलांच्या बाळांची देखील १८ महिन्यांनंतर तपासणी केली जाईल.

बाळ जन्मल्यानंतर १८ महिन्यांचं झाल्यानंतर त्याची एचआयव्ही चाचणी केली जाते. त्यानंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे स्पष्ट होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT