Atiq Ahmed shot dead 
देश

Atiq Ahmed shot dead : मोठी बातमी! मुलगा असदनंतर गँगस्टर अतिक अहमद अन् भाऊ अश्रफचाही गोळीबारात मृत्यू

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशातील अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचाही दोन-तीन जणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. या दोघांना मेडिकल टेस्टसाठी नेताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा दोन नंबराच मुलगा असद याला दोन दिवसांपूर्वी झाशी इथं पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही यामध्ये मारला गेला होता. उमेशपाल हत्या प्रकरणातील तो प्रमुख आरोपी होता.

दरम्यान, २००५ मध्ये बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात अतिक अहमद आरोपी होता. तेव्हापासून तो फरार होता. पण नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही दिवसांपूर्वी अतिकला गुजराच्या साबरमती तुरुंगातून त्याला नुकतंच प्रयागराज तुरुंगात हालवलं होतं. आपल्याला गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशात ट्रान्झिट रिमांड नको होती. पण अखेर त्याला जी भीती वाटत होती ती खरी ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT