देश

धक्कादायक! स्टेजवरुन उतरली नाही म्हणून बारबालेवर झाडली गोळी

तो वारंवार तिला पैसे घेण्याचा आग्रह करत होता. पण...

शर्वरी जोशी

उत्तर प्रदेशमधील uttar pradesh कायदा व सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर shahjahanpur येथील मिर्झापूरमध्ये mirzapur पैसे न घेणं एका बारबालेला चांगलंच महागात पडलं आहे. एक व्यक्ती वारंवार बारबालेला पैसे घेण्याचा आग्रह करत होता. मात्र, पैसे घेण्यासाठी ती स्टेजवरुन खाली न उतरल्यामुळे रागाच्या भरात त्याने बारबालेवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने या अपघातात बारबाला बचावली आहे. मात्र, तिच्यासोबतच्या अन्य एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. (uttar-pradesh-bar-bala-was-shot-by-a-young-man-in-shahjahanpur)

मिर्झापूर येथील पृथ्वीपूर गावात राहणाऱ्या प्रदीप कुशवाहा यांच्या मुलाचं बारसं असल्यामुळे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी काही बारबालांना खास डान्स करण्यासाठी बोलावलं होतं. त्यामुळे हा डान्स पाहण्यासाठी गावातील अनेक तरुण मंडळींनी गर्दी केली होती.

या कार्यक्रमात रामनिवासी यादव हा गावकरीदेखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे बारबाला करत असलेला डान्स पाहून रामनिवासीने एका बारबालेला बक्षीस म्हणून पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या बारबालेने स्टेजच्या खाली येऊन पैसे घ्यावेत असा त्याचा अट्टाहास होता. परंतु, वारंवार सांगूनही बारबाला स्टेजखाली न उतरल्यामुळे त्याने रागाच्या भरात तिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यातून बारबाला सुदैवाने बचावली. मात्र, तिच्यासोबत असलेल्या दयाराम यांच्या हाताला गोळी लागली. ज्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. घडलेला प्रकार पाहिल्यानंतर उपस्थित लोकांनी रामनिवासला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

दरम्यान, या प्रकारानंतर रामनिवासला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली आहे. तसंच लवकरच त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजीव कुमार बाजपेयी यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT