BJP Leader Advocate Gaurav Jaiswal
BJP Leader Advocate Gaurav Jaiswal  esakal
देश

दारूच्या दुकानासमोर बोलावून भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

सकाळ डिजिटल टीम

आरोपींनी भाजप नेत्याच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढलाय.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्यात भाजप नेते (BJP) आणि वकील गौरव जयस्वाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. ही घटना सोमवारी रात्री उशिरा शहरातील चिरुहा वॉर्डाजवळ असलेल्या एका दारूच्या दुकानासमोर घडली. गौरव जयस्वाल हा नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल जयस्वाल यांचा पुतण्या होता.

आरोपींनी गौरव यांच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढलाय. भाजप नेत्याला आधी फोन करून दारूच्या दुकानासमोर बोलावून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडली. ही बाब भाजप कार्यकर्त्यांना समजताच, त्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केलीय. दरम्यान, एसपी प्रदीप गुप्ता यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय. गौरव हा भाजपच्या स्वच्छता अभियानाचा सहसंयोजकही होता.

पोलीस अधीक्षक प्रदीप गुप्ता (Police Pradeep Gupta) यांनी सांगितलं की, या प्रकरणी दुकानाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. लवकरच आरोपींची ओळख पटवून अटक करण्यात येईल. दरम्यान, सोमवारी रात्री 10:25 वाजता चिरुहा येथील दारूच्या दुकानाजवळील बिर्याणी सेंटरमध्ये काही लोकांनी गौरववर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. तर दुसरीकडं ही माहिती मिळताच नगरपालिकेचे अध्यक्ष कृष्ण गोपाल जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि गौरवला तातडीनं जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, डॉक्टरांनी गौरवला मृत घोषित केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT