crime news esakal
देश

Crime News : लग्नात रसगुल्ल्याची बादली चोरीला; नवरीच्या काकाची निर्घृण हत्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः किरकोळ कारणावरुन एका लग्नामध्ये वाद पेटतो आणि त्यामध्ये चक्क नवरीच्या काकाची मारुन मारुन हत्या होते. ही घटना उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी येथे घडली आहे.

मैनपुरी गावामध्ये एका लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र लग्नादरम्यान रसगुल्ल्याने भरलेली एक बादली चोरी झाली. त्यानंतर मांडवात एकच हाणामारी सुरु झाली. या मारहाणीत जास्त जखम झाल्याने नवरीच्या मावशीचा नवरा मृत झाला आहे.

अनेक लोकांनी नवरीच्या काकाला मारहाण केल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या भांडणात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयमधये उपचार सुरु आहेत.

मृत रणबीर सिंग हे मेव्हणा रामकिशोरसोबत बिकापूरमध्ये साडूच्या मुलीच्या लग्नासाठी आले होते. वऱ्हाडी मंडळींचं जेवण आटोपलं होतं. गावातले अजय आणि रजत नावाचे दोन तरुण रसगुल्ल्याची बादली चोरी करत असतांनाच रणबीर आणि रामकिशोर यांनी त्या दोघांना रोखलं. त्यानंतर मांडवात वाद सुरु झाला.

गावतले इतर तरुण आणि रामकिशोर यांच्या रसगुल्ल्यावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर मारहाण झाली. रजत आणि अजयच्या बाजूने भांडणात उतरलेल्या गावकऱ्यांनी रणबीर यांची बेदम मारहाण करत हत्या केली. मृत रणबीरचा मेव्हणा रामकिशोर यालाही गंभीर जखम झाली आहे. या घटनेने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT