Crime_Woman_ 
देश

बलात्कारास विरोध करणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा खून; पीडितेला घरातच पुरले

सकाळन्यूजनेटवर्क

बुलंदशहर- एका अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी २२ वर्षीय आरोपीला हिमाचल प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिचा खून करून तिला घरातच दफन केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना बुलंदशहर जिल्ह्यातील सिरोरा येथे २५ फेब्रुवारीला घडली. २८ फेब्रुवारी रोजी वडिलांनी आपली १२ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. आरोपी हरेंद्रने तिचे अपहरण केल्याचा आरोप वडिलांनी केला होता. काल मंगळवारी पीडितेचे मृतदेह आरोपीच्या घरात सापडला आणि आज सकाळी ७.३० च्या सुमारास आरोपीला सिमल्यात अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सिरोरा गावात राहणारी पीडित २५ फेब्रुवारी रोजी आई आणि बहिणीसमवेत काम करण्यासाठी शेतात गेली होती. काम करताना तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी जवळच्या घरात गेली. ती परतली नाही तेव्हा तिच्या कुटुंबाने तपास सुरू केला. बराचवेळ शोधूनही ती सापडली नाही. शेताजवळ असलेल्या घराची तपासणी केली, परंतु तेथे एक मद्यपी युवक भेटला. या घटनेनंतर आरोपी पळून गेला.

Ration Card: रेशन कार्डसंबंधी सर्व समस्या सोडवा; टोल-फ्री क्रमांकावर फक्त एक...

यादरम्यान अनुपशहर पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवारीला तक्रार दिली. तेव्हापासून मुलीचा शोध सुरू होता. परंतु कोणतेही पुरावे सापडत नव्हते. एका स्थानिक नागरिकाने एका व्यक्तीने एका मृतदेहाचे दफन केल्याची खबर दिली. त्यानंतर गावकरी आरोपीच्या घरी जमले. तेथे मातीचा ढिगारा दिसला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर तो ढिगारा बाजूला केल्यानंतर मृतदेह सापडला. दुसरीकडे आरोपीने चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, पीडित मुलगी पाणी पिण्यासाठी घरी आली. आपण तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध करत मदतीसाठी हाका मारल्या. पण तिचा आवाज दाबला आणि यात तिचा मृत्यू झाला. तिला आपल्या घराच्या परिसरातच दफन केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

"लग्न करणं हे माझं स्वप्न होतं.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली..

Latest Marathi News Live Update : पुण्यात नदीत पोहताना १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

March 2026 Holidays: मार्च 2026 मध्ये शाळा–कॉलेज कोणत्या दिवशी बंद राहणार? जाणून घ्या होळी, गुढीपाडवा, ईदसह संपूर्ण सुट्ट्यांची यादी

MSRTC: अफवांना बळी पडू नका; सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी कोणतीही नवीन सक्ती नाही, एसटी महामंडळाचा खुलासा

SCROLL FOR NEXT