crime News sakal
देश

Crime News: घराबाहेर खेळणाऱ्या निष्पाप मुलाला रस्त्यावर आपटून मारले, क्रूरता पाहून लोकं हादरले

Chinmay Jagtap

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

ती म्हणजे घराबाहेर खेळणाऱ्या एका १९ महिन्यांच्या निरागस बालकाला माथेफिरुने रस्त्यावर फेकून ठार मारले आहे. ही क्रूरता पाहून तेथे उपस्थित महिलांना धक्काच बसला.

आधिक माहीती अशी की, शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोहनाग गावातील इलेक्शन पटेल ही व्यक्ती सायकलवरून घरी परतत होती.

यावेळी पत्नीही त्याच्या मागे पायी चालत होती. यावेळी इलेक्शन पटेल गावातील अनुज सहानी यांच्या घराजवळ पोहोचला. .यावेळी अनुजचा १९ महिन्यांचा मुलगा आदर्श घरासमोरील रस्त्यावर खेळत होता.

यावेळी पटेलने निष्पाप मुलाला उचलून सीसी रोडवर फेकून दिले. यावेळी काही महिलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत मुलाला दोन-तीन वेळा आपटल होत आणी लाहनग्याचा जागीत मृत्यृ झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पटेलला पकडून सी.एच.सीमध्ये नेले. सकाळपासून आरोपी दारूच्या नशेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तो रोज लोकांशी भांडत राहतो. सुमारे चार वर्षांपूर्वी त्याचे वडील गुरदिन पटेल यांच्या हत्येचा आरोपही त्याच्यावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT