Yogi Adityanath esakal
देश

'यांना' संपवण्यासाठीच राजकारणात प्रवेश केला : योगी आदित्यनाथ

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजकारणात प्रवेश करण्यामागचं 'कारण' सांगितलं.

UP Assembly Election : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राजकारणात प्रवेश करण्यामागचं 'कारण' सांगितलं. 'माफिया राज' संपवण्यासाठी मी मठ सोडलं आणि राजकारणात आलो, असं ते म्हणाले. 1994-95 च्या कालखंडाचा संदर्भ देत योगी म्हणाले, त्यावेळी मी खूप लहान होतो. माझ्यासाठी मठाचा वारसा नवीन होता. त्या काळात व्यापारी व लोकांची घरं बळकावल्याची अनेक प्रकरणं समोर येत होती. माझ्या समोर एका कुटुंबाचं घर माफियांनी बळकावून ताब्यात घेतलं. शिवाय, माफियांनी अनेकांच्या इमारतीही पाडल्या. या घटनेनी मी संतप्त झालो. एका घटनेत माझ्या घरावर कब्जा करणाऱ्या गुंडांना जनतेनं चोप दिला. तेव्हाच मी मनाशी ठरवलं, आपल्याला राजकारणात जाऊन माफिया राज संपवायचाय आणि मी लागलीच निर्णय घेतला.

इतकंच नाही तर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, माफिया हा कोरोना व्हायरसपेक्षाही (Coronavirus) भयंकर आहे. माफिया हा फक्त माफियाच आहे, त्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) भाजपला (BJP) 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी योगींनी सपावरही जोरदार निशाणा साधत टीका केली.

योगी पुढे म्हणाले, आमचं सरकार यूपीत 'धाम' विकसित करत आहे, तर आधी फक्त स्मशानभूमींवर लक्ष केंद्रित केलं जात होतं. आम्ही माफियांशी एकटं लढत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मोठं काम होत आहे. विशेष म्हणजे, योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर भाजप पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही उमेदवार घोषित केला नव्हता आणि विजयानंतर योगी यांच्याकडं कमान सोपवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एबी डिव्हिलियर्स, ऐकतोस ना! प्लीज मला मदत कर... सूर्यकुमार यादवची आफ्रिकेच्या दिग्गजाला विनंती; म्हणाला, माझं करियर वाचव..

बिहार मतदानापूर्वी राहुल गांधींचा 'हायड्रोजन बॉम्ब', केंद्राने कसं मॅनेज केलं, धक्कादायक आरोप अन् पुरावे एका क्लिकवर

Uddhav Thackeray In Beed : ''फडणवीस दगाबाज, सत्तेबाहेर करणं हाच पर्याय''; ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद, बच्चू कडूंच्या आंदोलनावरही बोलले...

Solapur Crime: 'साेलारपुरात महिला डॉक्टरचा रुग्णाकडून विनयभंग'; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या पोस्टची रंगली चर्चा; म्हणाली- शेवटचा दिवस....

SCROLL FOR NEXT