देश

काँग्रेसचाही स्वबळावर लढण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षापाठोपाठ उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रदेश काँग्रेस प्रमुख अजयकुमार लल्लू यांनी स्वबळावर लढण्याची क्षमता असल्याचे ठामपणे सांगत प्रियांका गांधी यांच्यावर मदार असल्याचे स्पष्ट संकेत देणारे घोषवाक्य म्हटले आहे.

बदलाव की आँधी है, जिसका नाम प्रियांका गांधी है असे घोषवाक्य लल्लू यांनी उच्चारले. सप आणि बसप या दोन पक्षांनी कोणत्याही प्रमुख पक्षाबरोबर युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर लल्लू म्हणाले की, युती न करता लढण्याची आणि पुढील सरकार स्वबळावर स्थापन करण्याची क्षमता काँग्रेसकडे आहे. अत्याचारी भाजप सरकारचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसने स्थान निर्माण केले आहे. आमच्याकडे पाचच आमदार असले तरी ४०३ सदस्यांच्या विधानसभेत ४९ आमदार असलेल्या सपपेक्षा परिणामकारक विरोधी पक्ष काँग्रेस असल्याचे आम्ही सिद्ध केले आहे.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी प्रियांका या उत्तर प्रदेशच्या कॅप्टन असल्याचे सांगत मुख्यमंत्रिपदासाठी योग्य चेहरा असल्याचे वक्तव्य केले होते. प्रियांका यांना राज्याच्या नेतृत्वासाठी दावेदार करण्यात यावे का, या प्रश्नावर लल्लू म्हणाले की, राष्ट्रीय पक्षनेतृत्वाने हे ठरवायला हवे. प्रियांका यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पातळ्यांवर पक्षाचे संघटन भक्कम करण्यात आले आहे. त्या राज्याच्या सूत्रधार आहेत. उत्तर प्रदेशची जनता काँग्रेसकडे आशेने पाहात आहेत. प्रियांका यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह निर्माण झाला आहे.

प्रियांका गांधी यांच्या रूपाने उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत. विधानसभेची निवडणूक त्यांच्या देखरेखीखाली लढविली जाईल. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस तीन दशकांच्या खंडानंतर उत्तर प्रदेशात सत्तेवर पुनरागमन करेल.
- अजयकुमार लल्लू, प्रदेशाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT