देश

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

संतोष कानडे

Uttar Pradesh Bus Accident : उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे रविवारी दुपारी भीषण बस अपघात झाला. ट्रक आणि बसच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बस एका बाजूने कापून निघाली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.

बांगरमऊ येथून उन्नावकडे जात असलेली खासगी बस सफीपूर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमल्दीपूर गावाजवळ पोहोचली असता बसला अपघात झाला. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसला एका बाजूने ट्रकने कापत नेलं.

अपघातानंतर घटनास्थळी लोकांचा कर्कश आवाज घुमला होता. प्रवाशी मोठमोठ्याने किंचाळत होते. आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. जखमी आणि मृत लोक बसच्या फाटलेल्या साईडने लटकत होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवलं. काहींना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

घटनेनंतर ट्रक चालक चकलवंशी रस्त्याने पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केली आहे. जखमींवर सफीपूर सीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी आणि मृतांबद्दल पोलिस माहिती घेत आहेत. घटना एवढी भीषण होती की धडक बसल्यानंतर बसमधील एक प्रवाशी रस्त्यावर येऊन पडला. त्यात त्याचं डोकं फुटलं. एवढंच नाही तर दोन प्रवाशांचं डोकं धडावेगळं झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: राजस्थान-मुंबई सामना, पावसामुळे टॉसला विलंब

SCROLL FOR NEXT