Uttar Pradesh Kashi Toll Plaza  esakal
देश

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

टोल कर्मचाऱ्यांनी मेरठमधील परतापूर पोलिस ठाण्यात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले असून आरोपी कार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Sandip Kapde

मेरठ : काशी टोल प्लाझा येथे टोल मागितल्यावर दिल्लीहून येणाऱ्या एका कारने टोल प्लाझाच्या एका महिला कर्मचाऱ्याला धडक दिली. महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशमधील काशी टोल प्लाझाचे व्यवस्थापक अनिल शर्मा म्हणाले, "दिल्लीहून आलेल्या एका कारने आमच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. टोल मागितल्यावर कारने कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन ती गंभीर जखमी झाली. ही गंभीर घटना असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत."

नेमकं काय घडलं?

सोमवारी दुपारी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर असलेल्या काशी टोल प्लाझा येथे महिला कर्मचारी टोल घेण्यासाठी एका गाडीसमोर गेली. गाडीच्या समोर पोहोचल्यावर दिल्लीहून येणाऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांनी टोल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर कार चढवली. महिलेला १०० मिटरपर्यंत फरफटत नेले. जखमी कर्मचारी मनीषा चौधरी यांना उपचारासाठी सीएचसीमध्ये पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणी कार क्रमांकाच्या आधारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर पोलिस तैनात करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहे. ही घटना टोल प्लाझावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. टोल कर्मचाऱ्यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मेरठमधील परतापूर पोलिस स्टेशनला दिले असून आरोपी कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

160 रुपयांसाठी जीवे मारण्याचा बेत

फक्त 160 रुपयांसाठी कर्मचाऱ्याच्या जीवावर लोक उठले. कर्मचारी मनीषा चौधरी यांच्यावर प्रवाशांनी हल्ला केला. त्या कारमध्ये तीन-चार जण बसले होते. त्या वाहनावर फास्टॅगही नव्हता. त्यांना पैसे मागितले असता त्यांनी कर्मचाऱ्यावर गाडी चढवली,  अशी माहिती स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT