marriage marriage
देश

लेकीच्या नाकावर टिच्चून सासूने थाटला जावयासोबत संसार

प्रेमासाठी वाट्टेल ते! २५ वर्षीय जावयाने ५० वर्षाच्या सासूला नेलं पळवून

शर्वरी जोशी

प्रेमासाठी वाट्टेल ते असं म्हणतं प्रेमाखातर अनेक प्रेमयुग्गुल पळून गेल्याचं आपल्या ऐकिवात आहे. आपली आवडती व्यक्ती आयुष्याचा जोडीदार व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते करायला तयार असतात. यात अनेकदा घरातल्यांच्या विरोधालाही सामोरं जावं लागतं. असाच एक प्रकार सध्या चर्चेत आला आहे. मात्र, या प्रकरणात कोणतेही तरुण मुलं पळून गेले नसून चक्क सासू आणि जावई पळून गेले आहेत. विशेष म्हणजे सासरे आणि मुलीचा विरोध पत्करुन या सासू- जावयाने लग्न केलं आहे. (uttar-pradesh-muzaffarnagar-mother-in-law-married-her-son-in-law)

मुजफ्फरनगर येथील भौराकला येथे हा प्रकार घडला आहे. ५० वर्षीय सासू आणि २५ वर्षाचा जावई यांनी पळून जाऊन लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या महिलेने आपल्या मुलीच्या संसाराचा जराही विचार न करता थेट जावयासोबतच प्रेमसंबंध निर्माण केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे. सासू आणि जावयाने केलेल्या प्रकारामुळे त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भौराकला येथे राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेच्या मुलीचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, ही महिला आपल्या जावयाच्याच प्रेमात पडली. इतकंच नाही तर हा जावईदेखील सासूच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे एक दिवस हे अचानक घरातून पळून गेले आणि १० महिन्यांनंतर परत आले. मात्र, यावेळी आम्ही कोर्ट मॅरेज केलं असून आता नवरा-बायको आहोत असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, सासू आणि जावयाच्या या नात्यावर मुलीने आणि सासऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे या चौघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झाले. परिणामी, त्यांच्या भांडणांचा त्रास होत असल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सासू व जावयाला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT