uttar pradesh news 10th student died after drinking cool water while playing cricket  
देश

क्रिकेट खेळल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायला अन्...; दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हर्ट अटॅकने मृत्यू

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना थंड पाणी प्यायल्यानंतर दहावीत शिकणारा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कार्तिक पुजारी

लखनऊ- उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना थंड पाणी प्यायल्यानंतर दहावीत शिकणारा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. (uttar pradesh news 10th student died after drinking cool water while playing cricket)

लाईव्ह हिंदूस्तानने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. नगरच्या कायस्थानमध्ये राहणारा १६ वर्षीय प्रिन्स आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यानंतर त्याने थंड बॉटलमधील पाणी प्यायले आणि अचानक तो मैदानावर बेशुद्ध पडला. घाबरलेल्या मित्रांनी त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. दाव्यानुसार, प्रिन्सचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, प्रिन्सचा मृतदेह जेव्हा घरी आणण्यात आला तेव्हा तिची आई बेशुद्धच पडली. तिला आपला मुलगा आता या जगात नाही यावर विश्वासच बसला नाही. प्रिन्स हा शांत स्वभावाचा मुलगा होता. शिक्षणातही चांगला होता. तीन भावंडामध्ये तो सगळ्यात मोठा होता. शनिवारी शाळेला सुट्टी असल्याने तो खेळायला गेला होता. पण, त्याच्या अशा प्रकारच्या एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. खेळल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने प्निन्स बेशुद्ध पडला होता. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

अमरोहाचे डॉक्टर ध्रुवेंद्र कुमार यांनी सांगितलं की, खेळ खेळल्याने प्रिन्सच्या शरीराचे तापमान वाढलेले होते. लगेच थंड पाणी प्यायल्याने त्याच्या शरीराचे तापमान अचानक कमी झाले. त्याच्यामुळे त्याला हर्ट अटॅक आला. त्यामुळे कधीही खेळ किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT