prime minister narendra modi controversial hoarding 
देश

युपीत चौकात लागले #ByeByeModi पोस्टर; 5 जण अटकेत

सकाळ डिजिटल टीम

PM Narendra Modi Controversial Hoarding : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मध्यरात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होर्डिंग्ज लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर हे पोस्टर लावणाऱ्या ५ जणांना अटक करण्याल आली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा कट तेलंगणामधून रचण्यात आला होता, तसेच पोस्टर तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्याने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या ऑपरेटर्सकडून छापले होते. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की या कामासाठी ऑपरेटरला तेलंगणातून फोन आला आणि त्याला १० हजार रुपयांमध्ये कंत्राट देण्यात आले होते.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहरात रिझर्व्ह पोलिस लाईनजवळील मुख्य रस्त्यावर अज्ञात लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संदेश असलेले हे होर्डिंग लावले होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या (BJPYM नेत्यासह तेथे येणाऱ्या लोकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर शनिवारी हे होर्डिंग हटवण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. होर्डिंग लावणारे मजूर आणि सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी नंतर आरोपींचा शोध घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी इव्हेंट कंपनीचे संचालक, प्रिंटिंग प्रेसचा मालक आणि होर्डिंग लावणाऱ्या मजूरांसह तब्बल पाच जणांना या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. अटक झालेल्या कंपनीचे संचालक अनिकेत केशरवानी यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना साई नावाच्या एका व्यक्तिने फोन केला होता, ज्याने तो तेलंगणाचा असल्याचे सांगितले. तसेच त्याने पोस्टर छापण्यासाठी १० हजारांचे कंत्राट देखील दिले होते.

या होर्डिंग्जमध्ये काय होते

पंतप्रधान मोदींच्या विरोधात लावण्यात आलेल्या या होर्डिंग्जमध्ये #ByeByeModi असा हॅशटॅग होता आणि त्यात रद्द झालेले कृषी कायदे, कंत्राटी नोकऱ्या, स्वयंपाकाच्या गॅसची वाढती किंमत इत्यादी मुद्द्यांचा समावेश होता. 'कृषी कायद्याला विरोध करताना तुम्ही अनेक शेतकर्‍यांचा बळी घेतला आहे' आणि 'कंत्राटी नोकऱ्यांमुळे तरुणांची स्वप्ने नष्ट झाली आहेत', असे या होर्डिंग्जवर लिहिले होते. यात पीएम मोदींचे व्यंगचित्र देखील दाखवण्यात आले आहे, ज्यासोबत 1105 रुपये किमतीचा गॅस सिलिंडर देखील दाखवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT