Akhilesh Yadav and SHivpalsinh Yadav sakal
देश

Uttar Pradesh Politics : यूपीमध्ये काका-पुतण्याची एकी

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली.

सकाळ वृत्तसेवा

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली.

सैफई - उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे भाऊ शिवपालसिंह यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष (लोहिया) सपमध्ये विलीन केला. मुलायम यांचे पुत्र अखिलेश यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी फारकत घेऊन वेगळा पक्ष स्थापन केला होता.

मैनपुरीत स्नुषा डिंपल यांच्या विजयासाठी एकजूट दाखविल्यानंतर शिवपाल यांनी स्वतः ही घोषणा केली. त्यावेळी अखिलेश हे उपस्थित होते. दुपारी अखिलेश यांनी काकांना सपचा ध्वज प्रदान करीत एकीचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर सपच्या यशाचा जल्लोष सुरु असतानाच ही घडामोड घडली.

पुतण्याकडून काका सपचा ध्वज स्वीकारत असल्याची छायाचित्रे दुपारीच व्हायरल झाली. त्यानंतर शिवपालसिंह यांच्या मोटारीवर काही कार्यकर्त्यांनी सपचा ध्वज लावला.

वास्तविक अखिलेश आणि शिवपालसिंह यांच्यात वर्षाच्या प्रारंभी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीची शक्यता होती, पण त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मतभेद आणखी वाढले. अखिलेश यांची ज्या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली त्यावेळी आमंत्रण नसल्यामुळे शिवपालसिंह नाराज झाले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

काका-पुतण्यामध्ये २०१६ मध्ये वादाची ठिणगी पडली. तेव्हा अखिलेश यांनी शिवपाल यांना पक्षातून काढले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवपाल यांनी नव्या पक्षासह नशीब अजमावले, पण त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी काका-पुतण्याने वेगवेगळ्या रथयात्रा काढल्या होत्या.

आज मात्र शिवपाल यांच्या पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीवरून प्रगतिशील समाजवादी पक्षाचा (लोहिया) ध्वज खाली उतरविण्यात आला. या पक्षाचे मुख्य प्रवक्ते दीपक मिश्रा म्हणाले की, ‘समाजवादामध्ये नवा बदल झाला आहे. अखिलेश व शिवपाल यांच्यामध्ये गैरसमज होते. ते आता दूर झाले आहेत. यापुढे भाजप आणि सप यांच्यात थेट मुकाबला होईल.’

आम्ही प्रगतिशील समाजवादी पक्ष (लोहिया) सपमध्ये विलीन केला आहे. २०२४ मध्ये आम्ही लोकसभेची लढाई एकजुटीने लढू. आजपासून सपचा ध्वज माझ्या मोटारीवर असेल.

- शिवपालसिंह यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT