Crime Video Sakal
देश

Crime : ट्रान्सपोर्ट मॅनेजरची ऑन कॅमेरा काठीने मारहाण करत हत्या; एका महिन्यात होणार होते लग्न

आरोपीला भाजप नेत्यांचे संरक्षण असल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेशमधील शाहजहांपूर येथे एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मॅनेजरची काठीने बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मॅनेजरवर चोरीचा ठपका ठेवत त्याची हत्या करण्यात आली.

अधिक माहितीनुसार, शिवम जौहरी (३२) असं हत्या झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. त्याला खांबाला बांधून मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवमच्या वडिलांनी व्यापारी नीरज गुप्ता आणि ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक बंकीम सुरी यांच्यासह सात लोकांविरोधात खुनाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

शिवमचे वडील अधीश जौहरी यांनी सांगितलं की, "शिवम हा मागच्या सात वर्षापासून शाहजहांपूर सुरी ट्रान्सपोर्ट येथे मॅनेजर म्हणून काम करत होता. मंगळवारी सायंकाळी त्याला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

तेथीलच कर्मचारी असलेल्या बलराम याने शिवमला करंट लागल्याचं आम्हाला सांगितलं पण आम्ही ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं तेव्हा त्याच्या अंगावर निशाण होते. तो अवघ्या ३२ वर्षाचा होता. एका महिन्यानंतर त्याचे लग्न होणार होते." अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे.

दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी दुपारी पोलिसांनी व्यावसायिक नीरज गुप्ता, ट्रान्सपोर्टचा मालक बंकीम सूरी, कुणाल अरोरा, शिवम गुप्ता, नीरज गुप्ता यांचे लेखापाल केशव आणि एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बंकीम सूरी यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT