देश

उन्नाव पिडितेच्या पत्राने भाजपची नाचक्की

सूरज यादव

२०१७ मधील या प्रकरणातील पिडीतेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना पत्र धाडून दाद मागितली.

उन्नाव - उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जवळच्या साथीदाराला जिल्हा पंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी दिल्यानंतर काही तासांत केंद्रातील तसेच उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपची नाचक्की झाली. पिडीतेने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहील्याने उमेदवार बदलणे भाजपला भाग पडले. उन्नावच्या बंगार्माऊ मतदारसंघात माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर यांचा साथीदार अरुण सिंह याला तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे सर्व बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया आल्या.

२०१७ मधील या प्रकरणातील पिडीतेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना पत्र धाडून दाद मागितली. अरुण हा नवाबगंज ब्लॉक पंचायतीचा प्रमुख आहे. त्याला तिकीट दिल्यास आपल्या जिवाला धोका असेल अशी भीती तिने व्यक्त केली. उमेदवार बदलावा अशी मागणीही तिने केली.

आधी इन्कार, प्रत्यारोप
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर रावत यांनी आधी हे आरोप फेटाळून लावले होते. याहून धक्कादायक म्हणजे हे आरोप निराधार असून हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा प्रत्यारोपही त्यांनी केला होता. याच रावत यांना नंतर माघार घ्यावी लागली. त्यांना नवे निवेदन जारी करावे लागले. पक्षनेतृत्वाच्या आदेशामुळे अरुण यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. आता दिवंगत माजी आमदार अजित सिंह यांची पत्नी शकुन निवडणूक लढवेल.

उपमुख्यमंत्र्यांकडून दखल
या प्रकरणाचे दिवसभर पडसाद उमटत होते. मिर्झापूर येथे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना दखल घ्यावी लागली. अरुणला तिकीट देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळाली असून पक्षनेतृत्व योग्य निर्णय घेईल असे निवेदन त्यांनी मिर्झापूर येथे केले.

उन्नाव पिडीतेचे मुद्दे
- गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईच्या गप्पा मारणाऱ्या भाजपकडून आपल्या वडीलांच्या खुनातील आरोपीला उमेदवारी
- माझ्या संपूर्ण कुटुंबाची वाट लावलेल्या सेंगरला भाजप सरकारचा अजूनही पाठिंबा
- आपल्या काकांना पोलिस कोठडीत टाकण्यात आले असून सेंगरच्या दडपणामुळे त्यांना पॅरोल नाकारला जातोय
- कुटुंबात कुणीही पुरुष सदस्य उरला नसल्यामुळे बहिणीच्या लग्नाचे प्रयत्न रखडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश नंतर...; व्यक्तीच्या कृत्यानं खळबळ, व्हिडिओ व्हायरल

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या संघात शेवटच्या क्षणात दोन बदल! ४ संघांकडून खेळणारा ऑल आऊंडर आला, सोबत सौराष्ट्रच्या किपरला घेतले

NEET Paper Leak Case: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाने कुणाचा नंबर? संशयास्पद संवाद सीबीआयच्या हाती

Pune NCP BJP MLC : पुणे विधानपरिषदेच्या जागेवरुन रस्सीखेच, राष्ट्रवादी -भाजपमध्ये संघर्षाची चिन्हे; भाजप नेत्यांने आकड्यांचा खेळ मांडला

India’s Fastest Man! भारताच्या गुरविंदरवीर सिंगने १०.०९ सेकंदात पार केले १०० मीटरचे अंतर; राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेचे तिकीट मिळवले

SCROLL FOR NEXT