evm file photo 
देश

Loksabha 2019 : 'बटण दाबलं हत्तीचं अन् चिठ्ठी आली कमळाची'

वृत्तसंस्था

लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपला मिळत असून, हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर येत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.

उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना क्षेत्रातील एका बुथवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. स्थानिक मतदारांनी आरोप करताना सांगितले की, कसौली येथील बुथ क्रमांक 16 येथे हत्तीचे चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतरही चौथे आणि पाचवे मतदान कमळाच्या चिन्हाला मिळत होते. शिवाय, हत्तीसमोरील बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती. याप्रकरणी बुथवरील निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रारही करण्यात आली. उमेदवार मलूक नागर यांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली. बसपचे उमेदवार मलूक नागर म्हणाले, 'मला मिळालेल्या माहितीनुसार, चौथ्या ते पाचव्या क्रमांकाचे मत भाजपला मिळत आहे. काहीवेळा सलगही मतदान केल्यास व्हीव्हीपॅट मशिनमधून कमळाचीच चिठ्ठी बाहेर येत होती.'

दरम्यान, याप्रकरणी बिजनोर क्षेत्राचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी राकेश कुमार यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मॉक व्होटींगवेळी अशा काही समस्या जाणवल्या होत्या. त्यामुळे, तात्काळ मशिनचा सेटअप बदलण्यात आल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे.  

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच देशातील 91 मतदारसंघात मतदान घेण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसह दक्षिण आणि उत्तर भारतातही मतदानप्रकिया पार पडली. मात्र, बहुतांश ठिकाणी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 100 ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे, असे सांगून पुन्हा मतदान घेण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पुँछ येथे काँग्रेसचे बटणच दाबले जात नसल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT