Ghaziabad
Ghaziabad esakal
देश

गोशाळेला भीषण आग; 50 गायींचा होरपळून मृत्यू, अनेक गायी जखमी

सकाळ डिजिटल टीम

गोठ्याला लागलेल्या आगीत 50 गायींचा होरपळून मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना समोर आलीय.

गाझियाबाद : गोठ्याला लागलेल्या आगीत 50 गायींचा (Cow) होरपळून मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना गाझियाबाद जिल्ह्यातून (Ghaziabad) समोर आलीय. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. दरम्यान, जखमी गायींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथं अनेक गायींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. मृत गायींची संख्या आणखी वाढू शकते, असं प्रशासनानं सांगितलंय. डीएम राकेश कुमार सिंह आणि एसएसपी मुनीराजही घटनास्थळी पोहोचले होते.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, इंदिरापुरम पोलीस स्टेशन (Indirapuram Police Station) हद्दीतील कानवनी परिसरामधील श्रीकृष्ण गोशाळेला ही आग लागल्याची माहिती आहे. गोशाळेचे संचालक सूरज पंडित यांनी सांगितलं की, सुमारे शंभर गायी गोठ्यात बांधल्या होत्या. सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गोठ्याच्या शेजारी असलेल्या चाऱ्याला अचानक आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी आला, असं त्यांनी नमूद केलं.

गोठ्यात गायींची काळजी घेत असलेल्या राजकुमारानं सूरज पंडित यांना माहिती देऊन गायींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुतेक गायींचा गुदमरून आणि भाजून मृत्यू झाल्याचं समोर आलं. यातील काही गायींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आग आटोक्यात आणण्यात आलीय. दरम्यान, जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीला तिसरा धक्का! आर अश्विनला मिळाली सामन्यातील दुसरी विकेट

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT