Uttarakhand  Sakal
देश

Ramnagar Accident News : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, 9 ठार

सकाळ डिजिटल टीम

शिमला : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर भागात एर्टिगा कार नदीत पडल्याने तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या वाहनात 11 जण होते, त्यापैकी एका मुलीला वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती कुमाऊ रेंजचे डीआयजी आनंद भरण यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि अग्निशमन दलाने धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, सर्व पीडित पंजाबमधील असल्याची माहिती मिळाली आहे. रामनगर कोटद्वार रोडवर असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कच्या झेला झोनमध्ये हा अपघात झाला आहे.

अपघात झालेली कार पहाटेच्या सुमारास कॉर्बेटच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचा वेग अधिक होता असे एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले. सध्या उत्तराखंडमध्ये पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच ही गाडी वाहून गेली. त्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या नदीवर पूल बांधण्याची चर्चा प्रशासनात सुरू असून यापूर्वीही येथे असे अपघात घडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT