Breaking News  Sakal
देश

Uttarakhand: हिमस्खलनानंतर पुन्हा भीषण अपघात; 50 प्रवाशांसह बस कोसळली दरीत

सकाळी द्रौपदी डंडा 2 शिखरावरील हिमस्खलनात १० जणांचा मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

डहराडून : हिमस्खलनात १० प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्यानंतर दिवसभरात उत्तराखंडमध्ये पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अपघातस्थळी सध्या बचाव कार्य राबवलं जात आहे. (Uttarakhand another deadly accident after avalanche bus fell into the valley with 50 passengers)

एएनआयच्या माहितीनुसार, पुरी गढवाल जिल्ह्यातील रिखनिखल-बिरोखल मार्गावरील सिमदी गावाजवळ ४५ ते ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.

द्रौपदी डंडा 2 शिखरावरील हिमस्खलनात १० जणांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तराखंडमध्ये द्रोपदी डंडा 2 या पर्वत शिखरावर हिमस्खलन झालं. यामध्ये नेहरु गिर्यारोहण अॅकॅडमीच्या २८ प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक गाडले गेले. यांपैकी सुरुवातीला ८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पण दहा जणांचा यात मृत्यू झाला, अद्याप अनेकजण यामध्ये अडकून पडले आहेत. या अडकलेल्या लोकांमध्ये पुण्यातील दोन प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT