देश

Uttarakhand: उत्तराखंडसाठी दुबईत रोडशो; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 12 हजार कोटींच्या बंपर गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेंटर समिट 2023 यासाठी दुबईमध्ये रोडशोचे आयोजन करण्यात आले होते. या रोडशोमध्ये मंगळवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विविध उद्योग समुदायांच्या उद्योग समूहांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या दिवशी विविध उद्योग समूहांसोबत 11925 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नऊ व आठ डिसेंबर रोजी डेहरादून येथे आयोजित करण्यात आलेल्या शिखर परिषदेसाठी सर्वांना आमंत्रित केले.

अधिक माहिती अशी की, उत्तराखंड सरकारने विविध उद्योग समूहांसोबत समंजस्य करार केले. यामध्ये पर्यटन, शिक्षण, रियल इस्टेट, आरोग्य इत्यादी संबंधित समूहांशी करार करण्यात आले. पहिल्या सत्रात तब्बल 5,450 कोटी रुपयांचे करार करण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात तब्बल 6,475 कोटी रुपयांचे करार करण्यात आले.

यावेळी सर बायोटेक आणि हयात इंडियासोबत 2 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तर फार्मा उत्पादनासाठी कार्मिला न्यूट्रिशन टेक्नॉलॉजी ग्रुपसोबत 950 कोटींचा करार करण्यात आला.

यावेळी जीटीसी ग्रुपसोबत 800 कोटी रुपयांचा करार करण्यात आल. रिअल इस्टेट, इन्फ्रा आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी फ्लो कॉन्ग्लोमेरेट ग्रुपसोबत 500 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. याच बरोबर इतर महत्वाचे करार यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT