Accident Sakal
देश

Uttarakhand Bus Accident: बस दरीत पडून अपघात; 25 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून : उत्तराखंडमध्ये ४५ ते ५० लोकांना घेऊन जाणारी प्रवासी बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तब्बल २५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं असून अनेकजण जखमी झाले आहेत. तर पोलिसांकडून बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली आहे.

(Uttarakhand Bus Accident Latest Updates)

अधिक माहितीनुसार, पुरी गढवाल जिल्ह्यातील रिखनिखल-बिरोखल मार्गावरील सिमदी गावाजवळ ४५ ते ५० प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मृत आणि जखमींना दरीतून वर काढण्यात आले असून यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू असून मृतांचा ठोस आकडा समोर आला नाही.

द्रौपदी डंडा 2 शिखरावरील हिमस्खलनात १० जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये द्रोपदी डंडा 2 या पर्वत शिखरावर हिमस्खलन झालं होतं. यामध्ये नेहरु गिर्यारोहण अॅकॅडमीच्या २८ प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक गाडले गेले. सुरुवातीला ८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पण दहा जणांचा यात मृत्यू झाला होता. तर यामध्ये अडकलेल्या लोकांमध्ये पुण्यातील दोन प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आजारांच्या वेदनांवर आरोग्य विभागाची फुंकर; वेदनादायक आजारांवर मिळणार जवळच पूरक उपचार

Latest Marathi News Live Update : राज्यात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

Green Book Record: साक्षीच्या विक्रमाची ‘ऑरेंज’ अन्‌ ‘ग्रीन बुक’मध्ये नोंद; शिवजयंतीदिनी सलग १२ तास १२ मिनिटे १२ सेकंद दांडपट्टा फिरवून घडवला इतिहास!

MP Ricky AJ Syngkon Passed Away : ज्येष्ठ खासदार फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन; राज्यावर शोककळा

Mukesh Ambani AI Vision : 'एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, उलट वाढणार; रिलायन्स गुंतविणार 10 लाख कोटी', मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT