देश

Uttarakhand: उत्तराखंड मधील उद्योजकांचे सहभागीदार उत्तराखंड राज्य असेल मुख्यमंत्र्यांचा रोड शो मध्ये विश्वास

सकाळ डिजिटल टीम

उत्तराखंडमध्ये येणाऱ्या उद्योगांचे तसेच गुंतवणूकदारांचे अप्रत्यक्ष सहभागीदार उत्तराखंड राज्य सरकार असेल. त्यांची सुरक्षा, भविष्य आणि विकास तसेच उद्योग सुरू राहील याची काळजी सरकार घेईल, अशी हमी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज येथे दिली.

डेहराडून येथे आठ व नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या इन्व्हेस्टर समिट साठी आज त्यांनी मुंबईत रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उद्योजकांना वरीलप्रमाणे ग्वाही दिली. उद्योजक गुंतवणूकदार व्यापारी आदींच्या सूचनांनुसार उत्तराखंडने अनेक उद्योगस्नेही धोरणे आखली आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

उत्तराखंड हा डोंगराळ विभाग असला तरी तेथे पंधरा हजार एकर जमिनीवर आधीच उद्योगधंदे आहेत. सहा-सात हजार एकर ची मोठी लँडबँक आम्ही आधीपासून तयार केली आहे. उद्योग स्थापणे तसेच त्यांना काम करणे, उद्योग चालवणे अत्यंत सहज सोपे व्हावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आम्ही धोरणही तयार केले आहे. अजूनही उद्योजकांच्या येणाऱ्या सूचना अमलात आणल्या जातील. महाराष्ट्र-मुंबई तसेच उत्तराखंड एकमेकांना पूरक आहेत. मुंबई-महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असून उत्तराखंड ही अध्यात्मिक राजधानी आहे. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये समन्वय झाल्यास ते साऱ्या देशासाठी हितकारक ठरेल असेही ते म्हणाले.

आपले भवितव्य आणि स्थान जिथे सुरक्षित दिसते तेथेच व्यापारी उद्योगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जातात. त्यामुळे उद्योजक आल्यावर ते येथे फसतील असे आमचे वर्तन राहणार नाही. तुम्हाला अडचणी येणार नाहीत, चर्चेने तुमच्या समस्यांवर मार्ग निघेल याची काळजी आम्ही घेऊ. उत्तराखंडच्या शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास जाईल याची आम्ही काळजी घेऊ. आतापर्यंत मुंबईत एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. उद्योजकांसाठी आम्ही एक खिडकी योजनाही सुरू केल्याने त्यांच्या अडचणी कमी होतील, असा विश्वासही धामी यांनी व्यक्त केला.

उद्योगांसाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ते म्हणाले की, उद्योजकांसाठी गुंतवणूक मित्रांची नियुक्ती करण्यात आली असून ते उद्योग स्थापनेसाठी सहाय्य करतील. पर्यटन, आयुष, वाहन निर्मिती, अन्नप्रक्रिया, औषध, ऊर्जा निर्मिती या क्षेत्रांवर सरकार लक्ष देत आहे. चार महिन्यात उद्योगांसाठी २७ धोरणे तयार करण्यात आली असून येथे उद्योजक कोणत्याही भयाशिवाय काम करू शकतील. येथील कायदा व सुव्यवस्था चांगली असून वीजदरही कमी आहे. डेहराडून मधून ४० विमानसेवा सध्या सुरू असून पंतनगरला लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल. दोन तासात रेल्वेव आणि रस्त्यानेही दिल्ली ते हरिद्वार-डेहराडून येता येईल अशा सोयी करण्यात येतील. राज्यात 71 टक्के वनक्षेत्र असून देवभूमी उत्तराखंडमध्ये बर्फ, पर्वत, नद्या, नॅशनल पार्क असल्याने चित्रपट क्षेत्रानेही येथे नि:शंकपणे यावे असेही आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT